World Cup : भारताला आणखी एक धक्का, धवन पाठोपाठ भुवनेश्वरही वर्ल्ड कपला मुकणार?

याआधी शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर गेला आहे, त्यामुळं भुवनेश्वर कुमारच्या रुपात भारताला दुसरा झटका बसू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 07:15 PM IST

World Cup : भारताला आणखी एक धक्का, धवन पाठोपाठ भुवनेश्वरही वर्ल्ड कपला मुकणार?

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये अपराजित अशा भारतीय संघाची चांगलीच चर्चा आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं गुणतालिकेत भारतीय संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भारताला दुसरा झटका बसण्याची शक्यता आहे. याआधी भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी दिली होती. मात्र अफगाणिस्तानविरोधात ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले नाही, तर विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळला.

मात्र, आता भारताला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारही वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतीय संघाने एका गोलंदाजाचा विचार सुरु केला आहे. त्यासाठी सोमवारी आणखी एक जलद गोलंदाज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भुवनेश्वर कुमार याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरोधतच्या सामन्याला मुकावे लागले होते. पाकिस्तान विरोधात त्यानं केवळ 2.4 षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते.

आतापर्यंत बीसीसीआयकडून भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसबद्दल काहीही अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या दुखापतीचे नेमके स्वरुप काय, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने आता भुवनेश्वरच्या जागी एका गोलंदाजाला इंग्लंडमध्ये बोलावले होते.

भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज विरोधात गुरुवारी होणार आहे. भुवनेश्वर सध्याच्या घडीला नेट्समध्येही गोलंदाजी करताना दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआयने नवदीप सैनी या जलद गोलंदाजाला बोलवून घेतले आहे. याआधी बीसीसीआयनं नवदीप सैनीबाबत, " सैनी हा एकमेव गोलंदाज आहे, जो भारतीय संघाबरोबर कायम राहणार आहे. तो संघाबरोबर नेट्मध्ये सराव करणार आहे", असे सांगितले होते. मात्र आता नवदीप भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात येणार का, हा प्रश्न चाहत्यांसोमर आहे.

मोहम्मद शमीचं योग्य पर्याय

Loading...

दुसरीकडे भुवनेश्वर कुमारच्या जागी अफगाणिस्तान विरोधात संघात सामिल झालेल्या मोहम्मद शमीनं तुफान गोलंदाजी केली. अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. मोहम्मद नबीने शमीच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक तर केलंच पण त्याने अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नबीचा हार्दिक पांड्याने झेल घेतला. नबीने सर्वाधिक 52 धावा केल्या. चौथ्या चेंडूवर शमीने अफताब आलमचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पाचव्या चेंडूवर मुजीब उर रहमानचा त्रिफळा उडवून हॅट्ट्रिकसह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वाचा- आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

वाचा- World Cup : कोण आहे ही हॉट अ‍ॅंकर, सचिनसोबतचा सेल्फी झाला VIRAL

वाचा-ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...