World Cup : ‘तो’ व्हिडिओ बॉल टेम्परिंगचा नाही तर…ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे स्पष्टीकरण

World Cup : ‘तो’ व्हिडिओ बॉल टेम्परिंगचा नाही तर…ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे स्पष्टीकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान झम्पानं चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • Share this:

लंडन, 11 जून : ICC World Cup 2019 स्पर्धेला सुरुवात झाली असून अनेक वादांनाही तोंड फुटले आहे. यातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा याने चेंडूशी छेडछाड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर झम्पाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा चर्चेत आला होता. मात्र आता कर्णधार अ‍ॅरोन फिंच यानं झम्पानं, ऊब घेण्यासाठी हात पँटच्या खिशात घातले होते,’ असे स्पष्टीकरण दिले आहे. इंग्लंडमधील वातावरण थंड असल्यामुळं खेळाडूच्या खिशात हात गरम करण्यासाठी गरम पाण्याचे साहित्य असते. त्याच्यात वापर केला गेला आहे.

''मी ती छायाचित्रे पाहिली नाहीत पण झम्पा स्वत:कडे ‘हॅन्डवॉर्मर’ ठेवतो. मी छायाचित्र न पाहिल्याने काही भाष्य करू शकत नाही. पण प्रत्येक सामन्यादरम्यान त्याच्याकडे हॅन्डवॉर्मर असते'', असेही त्यानं सांगितले.

याआधी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे मागच्यावर्षी द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी ठरले होते. दोघांना वर्षभराच्या बंदीचा सामना करावा लागला. भारताविरुद्धही असाच प्रसंग या संघावर ओढवला. त्यावर पराभवानंतर फिंचने स्पष्टीकरण दिले.

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

वाचा-फायनल सामन्यात 11 खेळाडू निलंबित, संघाने गमावली वर्ल्ड कप खेळण्याची संधी

VIDEO : कांगारुंची पुन्हा चीटिंग? वर्ल्ड कपमध्ये बॉलरच्या हालचालींची मोठी चर्चा

First published: June 11, 2019, 8:29 AM IST

ताज्या बातम्या