भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलवणारा सौरव गांगुलीचा 'हा' किस्सा दिसणार मोठ्या पडद्यावर

Saurav Ganguly कर्णधार पदी असताना भारतानं साकारलेल्या नेटवस्ट फायनल सामन्यतील विजयानं भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलवून टाकला.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 02:50 PM IST

भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलवणारा सौरव गांगुलीचा 'हा' किस्सा दिसणार मोठ्या पडद्यावर

मुंबई, 3 जून : सध्या जगभरात ICC World Cup ची धूम आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या खेळांवर सिनेमा बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. मागच्या काही काळापासून ‘83’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे.  अशातच आता दिग्दर्शक अभिनय देव यांनीही क्रिकेटवर आधारित आणखी एका सिनेमाची तयारी सुरू केली आहे. दिल्ली बेली सिनेमा आणि ‘24’ सारखी वेब सीरिजचं दिग्ददर्शन करणारे अभिनय आता 2002 मधील लॉर्ड्स (Lords)मैदानावर झालेल्या नेटवस्ट फायनल मॅचच्या विजयाच्या आठवणी ताज्या करणार आहेत. या अंतिम सामन्यानंतर क्रिकेटर सौरव गांगुलीनं आनंदाच्या भरात मैदानातच शर्ट उतरवून नाचला होता. हा किस्सा अभिनय आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत.

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

अभिनय सांगतात, ‘त्या सामन्यानं अनेक युवकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकाला. हा सामना झाला त्यावेळी मी 32  वर्षांचा होतो. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत भारतीय संघानं विजय साकारला होता. ज्यानंतर आनंदाच्या भरात सौरवनं टी-शर्ट काढत मैदानात नाचला होता. त्या सामन्यानंतर मला वाटलं की जर सौरव हे करू शकतो मग मी सुद्धा माझ्या जीवनात खूप काही करू शकतो.'

विराट कोहली नाही तर 'हा' क्रिकेटर आहे हृतिक रोशनचा मोस्ट फेवरेट

Loading...

 

View this post on Instagram

 

From the dressing room, to the commentary box 🎙 ... together always! #CWC19

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

अबिनय पुढे सांगतात, 'सौरवचा प्रभाव इतर युवकांप्रमाणे माझ्यावरही पडला. त्यामुळेच या सामन्यावर आधारित सिनेमा काढून तो जोश पुन्हा एकदा रिक्रिएट करु इच्छित आहे.’ हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक ठरला. सध्या भारताची गणना जगातल्या सर्वश्रेष्ठ देशांमध्ये केली जाते. त्यामुळे एक काल्पनिक कथा त्या ऐतिहासिक क्षणाशी जोडून हा सिनेमा बनवला जाणार आहे. ज्यामुळे आजच्या युवकांपर्यंत त्या भावना पोहोचतील.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे ही अभिनेत्री, तीन वर्षांपूर्वीच दिला मुलीला जन्म

 

View this post on Instagram

 

Prince of Calcutta! 👑 God of the off-side! 🙏🏽 Bengal Tiger! 🐯 #SauravGanguly DADA AMI TOMAKE BHALOBASHI ! ❤️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

भारतीय क्रिकेट संघानं 2002ला नेटवेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड विरूद्धचा सामना 2 विकेट्सनी जिंकला होता. युवराज सिंह आणु मुहम्मद कैफ यांच्या जोडीनं इंग्लंडने दिलेल्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत शेवटच्या ओवरमध्ये 326 धावा केल्या होत्या.

=================================================================

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...