VIDEO : तुम्हीही म्हणाल, व्वा! कसला भारी कॅच घेतला यार...

VIDEO : तुम्हीही म्हणाल, व्वा! कसला भारी कॅच घेतला यार...

वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्सने घेतलेल्या कॅचनंतर आता या कॅचची चर्चा होत आहे.

  • Share this:

नॉटिंगहम, 06 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 288 धावांत रोखले. एकवेळ ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 38 अशी झाली होती. तेव्हा स्टीव्ह स्मिथने एका बाजूने खिंड लढवून संघाला सुस्थितीत पोहचवलं. स्मिथला शेल्डन कॉट्रेलनं सीमारेषेवर जबरदस्त झेल पकडून बाद केलं. हा झेल यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोत्कृष्ट झेल ठरू शकतो.

स्मिथची विकेट वेस्ट इंडिजसाठी महत्वाची होती. पहिल्या 5 विकेट लवकर गमावल्यानंतर त्याने पडझड थांबवली. स्मिथने अर्धशक करत 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ओशाने थॉमसच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

स्टीव्ह स्मिथने 45 व्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअरवरून उंच फटका मारला. सीमारेषेवर असलेल्या शेल्डन कॉट्रेलनं चपळाईसोबत समयसुचकताही दाखवली आणि एका हाताने झेल पकडला. यावेळी आपण सीमारेषेबाहेर जाणार हे समजताच त्याने चेंडू वर फेकला आणि पुन्हा झेल घेतला. विशेष म्हणजे त्यानेच स्मिथचा झेल 26 धावांवर सोडला होता.

वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर स्मिथने 103 चेंडूत 7 चौकारांसह 73 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या स्मिथने अॅलेक्स कॅरी आणि नाथन नाइल सोबत महत्त्वाची भागिदारी करत संघाला 250 धावांचा टप्पा पार करून दिला.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर

खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading