World Cup : जगातल्या टॉप क्लास गोलंदाजांचा वर्ल्ड कपमधला ‘हा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल

World Cup : जगातल्या टॉप क्लास गोलंदाजांचा वर्ल्ड कपमधला ‘हा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल

या दिग्गज गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून काहींना आपलं बालपण आठवेल तर, काहींनी हा व्हिडिओ पाहिलाच नसेल.

  • Share this:

लंडन, 14 जून : ICC World Cup 2019मध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पावसानं. पावसामुळं आतापर्यंत 4 सामने रद्द झाले आहेत. मात्र, आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वांत जास्त चर्चा होत आहे ती गोलंदाजांची. पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरनं ऑस्ट्रेलियाविरोधात 5 विकेट घेत, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपला दबदबा कायम असल्याचे दाखवले. या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवता आला नाही. पण 90च्या दशकातले क्रिकेट चाहते जन्मालाही आले नसतील, तेव्हा जगातल्या टॉप क्लास गोलंदाजांनी फलंदाजांची दाणादाण उडवून लावली होती.

वर्ल्ड कपमध्ये या दिग्गज गोलंदाजांची चर्चा आजही आहे. यात ऑस्ट्रेलियाचा ग्रॅन मॅकग्राथ याचा पहिला क्रमांक लागतो. मॅकग्राथनं वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या 39 सामन्यात तब्बल 71 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा क्रमांक लागतो. त्यानं 40 सामन्यात 55 विकेट घेतल्या आहेत. तर वसिम अक्रमनं 38 सामन्यात 55 विकेट घेतल्या आहेत. यात भारताचा स्टार जलद गोलंदाज जहीर खानही मागे नाही. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जहीर खान पाचव्या क्रमांकावर आहे. तिनं 23 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं या दिग्गज गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून काहींना आपलं बालपण आठवेल तर, काहींनी हा व्हिडिओ पाहिलाच नसेल.

आयसीसीनं अपलोड केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात वसिम अक्रम, जहीर खान, मुरलीधरन, मॅकग्राथ , चामुंडा वास या पाच गोलंदाजांची तुफान गोलंदाजी आहे.

वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा

वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

वाचा- 'भारताला हरवणे सोपे', वकार युनिसनं पाकिस्तानला कानमंत्र दिला

उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 14, 2019, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading