नॉटिंगहम, 03 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी 348 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानने दिलेल्या या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे 4 फलंदाज दिडशेच्या आत तंबूत परतले होते. दरम्यान सुरुवातीला जॉनी बेअरस्टोनं एक असा फटका मारला की चेंडूचा तुकडा उडाला आणि आकार बदलला. त्यानतंर पंचांनी नवा चेंडू मागवावा लागला.
इंग्लंडच्या डावावेळी पाचव्या षटकात लेग स्पिनर शादाब खान गोलंदाजी करत असताना जॉनी बेअरस्टो फलंदाजीला होती. शादाबने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोनं षटकार मारला. तो चेंडू स्टेडियममध्ये स्टँडवर आदळला. जेव्हा चेंडू पंचांकडे आला तेव्हा त्याचा काही भागाचा तुकडा उडाल्याचं दिसलं. त्यानंतर पंचांनी नवा चेंडू मागवला आणि खेळ पून्हा सुरु केला.
बेअरस्टो जास्त काळ मैदानावर टिकाव धरू शकला नाही. 9 व्या षटकात तो बाद झाला. बेअरस्टोनं 31 चेंडूत 32 धावा केल्या. त्याला वहाब रियाजनं बाद केलं. तत्पूर्वी, वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 348 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 14 षटकांत 82 धावा केल्या. त्यानतंर 15 व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीव फखर जमान यष्टीचित झाला. त्याने 40 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर 21 व्या षटकात मोईन अलीनेच इमाम उल हकला बाद केलं. इमामने 58 चेंडूत 44 धावा केल्या.
पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी 88 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी मोईन अलीने फोडली. बाबर आझम 66 चेंडूत 63 धावा काढून बाद झाला. त्यावेळी संघाच्या 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बाबर बाद झाल्यानंतर हाफीज आणि कर्णधार सर्फराज अहमदने 80 धावांची भागिदारी केली. मोहम्मद हाफीजला बाद करून मार्क वूडने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. हाफीजने 84 धावा केल्या. 46 व्या षटकात पाकिस्तानच्या 300 धावा झाल्या. कर्णधार सर्फराज अहमदने 43 चेंडूत 55 धावांची वेगवान खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल
वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात
वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट
VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'