धोनी आणि साक्षी राहतात वेगवेगळे, BCCIच्या नियमाची आडकाठी

धोनी आणि साक्षी राहतात वेगवेगळे, BCCIच्या नियमाची आडकाठी

ICC Cricket World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करता आला नाही.

  • Share this:

नॉटिंगहम, 06 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयाचा जल्लोष भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत साजरा करता आला नाही. बीसीसीआयच्या नियमांमुळे भारतीय खेळाडू कुटुंबियांना भेटू शकत नाहीत. यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी एकमेकांपासून सध्या दूर आहेत.

भारतीय संघ 23 मे रोजी इंग्लंडला पोहोचला. यानंतर 2 सराव सामने खेळून बुधवारी पहिल्या सामन्यात विजय मिळवला. हा सामना पहायला साक्षी धोनी उपस्थित होती. पण बोर्डाच्या नियमामुले दोघांनाही एकमेकांसोबत राहता आलं नाही. तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबावं लागलं.

वर्ल्ड कप दरम्यान संघातील खेळाडूंच्या कुटुंबियांना पहिल्या 20 दिवसांत एकत्र राहता येणार नाही. साक्षी सध्या स्वखर्चाने दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबली आहे.

बीसीसीआयनं खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली असली तरी, ते केवळ 15 दिवस त्यांच्यासोबत राहू शकतात. तसेच, पहिल्या 21 दिवसांमध्ये कोणताही खेळाडू आपल्या पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहू शकत नाही.

खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विराट कोहलीनं बीसीसीआयकडे केली होती. मात्र बोर्डानं विराटशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता या स्पर्धेदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना सोबत ठेवण्यासंदर्भातील नियम जाहीर केले आहेत. या नवीन नियमांमुळे स्पर्धेच्या सुरुवातील क्रिकेटपटूंच्या जोडीदारांना त्यांच्या सोबत राहता येणार नाही. मागील काही परदेश दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांची सोय करण्यामध्ये बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळं हे नियम बनवण्यात आले होते.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर

खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading