परळ ब्रीज चेंगराचेंगरी ; आयबीएन लोकमतचे सवाल

परळ ब्रीज चेंगराचेंगरी ; आयबीएन लोकमतचे सवाल

परळ रेल्वे ब्रीजवरील चेंगराचेंगरीत 22 जणांचा हकनाक बळी गेलेत. तर 30च्या वर लोक जखमी झालेत. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे ? याबाबत आयबीएन लोकमतने काही महत्वाचे सवाल उपस्थित केलेत.

  • Share this:

आयबीएन लोकमतचे सवाल

- रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?

- लोकल स्टेशनवरच्या पायाभूत सुविधांची एवढी आबाळ का?

- दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असताना लोकल स्टेशनवर पुलांची संख्या एवढी कमी का?

- मेट्रो, बुलेटवर लक्ष असणाऱ्या सरकारला लोकलची अवस्था पाहायला वेळ नाही का?

- गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या रेल्वे आणि स्टेशनवरच्या प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?

- गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर यंत्रणा का नाही?

- हजारो कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या मुंबईकडे केंद्र सरकारचा कानाडोळा का?​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 03:11 PM IST

ताज्या बातम्या