होय, थोड्याच वेळात आम्ही बदलतोय

होय, थोड्याच वेळात आम्ही बदलतोय

येत्या काही तासांत IBN लोकमतची वेबसाईट News18lokmat.com या नावाने तुमच्या भेटीला येणार आहे.

  • Share this:

06 नोव्हेंबर : गेली आठ वर्ष गावापासून ते शहरांपर्यंत आणि शहरांपासून  देशा-विदेशातील मराठीजणांच्या मनावर  अधिराज्य गाजवणारी आयबीएन लोकमतची वेबसाईट आता नव्या नावाने ओळखली जाणार आहे. येत्या काही तासांत IBN लोकमतची वेबसाईट News18lokmat.com या नावाने तुमच्या भेटीला येणार आहे.

आठ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी वृत्तवाहिन्या 24X7 या रंगरुपात सादर होत होत्या तेव्हा डिजीटल युगात आयबीएन लोकमतने पहिले पाऊल टाकले होते.

गेल्या आठ वर्षांत आयबीएन लोकमतच्या वेबसाईटने अनेक यशाचे शिखर सर केले. तुमच्या आमच्या गावाकडील बातमी असो की विदेशात घडणारी एखादी घटना असो अशा प्रत्येक बातमीचा वेध आयबीएन लोकमतच्या वेबसाईटने घेतली आणि मराठी जनांपर्यंत पोहोचवला, आणि आजही पोहोचवतोय.

फेसबुक,टि्वटर, युट्यूब, गुगल प्लस आणि व्हॉटसअप या सोशल नगरीतही आयबीएन लोकमतचं आज मोठं साम्राज्य उभं आहेत. फेसबुकवर तब्बल २१ लाखाहुन अधिक वाचकवर्ग आयबीएन लोकमतला लाभलाय.  टि्वटरवर हीच संख्या १ लाख ६ हजार आहे. देशा-विदेशात व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणाऱ्या युट्यूबवर तब्बल ६ कोटी ३३ लाखांहुन अधिक प्रेक्षक वर्ग लाभलाय. दररोज घडणाऱ्या घडामोडीचा वेध घेणाऱ्या घटनांचा धावता आढावा व्हॉट्सअप बुलेटिनच्या माध्यमातून दररोज व्हॉटसअपवर शेअर केला जातो.

ग्रामपंचायत निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो किंवा विधानसभा,लोकसभा निवडणुकीचा निकाल असो आम्ही प्रत्येक निकाल सुस्पष्ट आणि जलदगतीने सादर करण्यात यशस्वी राहिलो. महाराष्ट्राच़्या विधानसभा निवडणुकीला आमच्या वेबसाईटला एक दिवसात एक कोटीहुन अधिक व्ह्यूज मिळाले होते.

दिवाळीत दीपोत्सव, गणेशोत्सवात बाप्पा मोरया रे, नवरात्री उत्सव, पंढरपूरची वारी असो अशा प्रत्येक उत्सवाचं आम्ही विशेष कव्हरेज केलं. बाप्पा मोरया रे या फेसबुक पेजला मराठी डिजीटल क्षेत्रात सर्वाधिक लाईक मिळालेले प्रथम क्रमांकाचं पेज ठरलाय.

अलीकडे मराठा क्रांती मोर्चाचं आम्ही कव्हरेज केलं होतं. या कव्हरजेचं युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं.  हा व्हिडिओ युट्यूबवर संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकावर ट्रेंडिंगला होतो. एवढंच नाहीतर महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा व्हिडिओही युट्यूबवर चौथ्या क्रमांकावर ट्रेडिंगला होता.

दररोज आम्ही ४० ते ५० बातम्या वेबसाईटवर अपडेट करत असतो. याच बातम्या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरही आम्ही शेअर करतोय. फेसबुकवर इतक्या मोठा वाचक वर्ग असल्यामुळे कोणत्याही बातमी, व्हिडिओला १० व्या सेकंदाच्या आत प्रतिसाद मिळण्यास सुरुवात होते. पुढे हा हजारो आणि लाखोंच्या घरात पोहोचतो. युट्यूबसह फेसबुकवरही दररोज ३५ ते ४० व्हिडिओ पोस्ट केले जातात. एवढंच नाहीतर आयबीएन लोकमतचे दिवसभरातील बुलेटिन, विशेष कार्यक्रम थेट LIVE केले जातात. वेगवेगळ्या विषयांवर एडिटर्सव्हाईस या सदराखाली आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सरांचं फेसबुक लाईव्ह केलं जातं.

वेबसाईटला दर महिऩ्याला ४० लाखांहुन अधिक वाचकवर्ग लाभलेला आहे. दररोज या वाचकवर्गात लक्षणीय वाढ आहे. ही वाढ अशीच वाढत ठेवण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.

First Published: Nov 6, 2017 03:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading