मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IBN लोकमत इम्पॅक्ट : 'त्या' विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकं

IBN लोकमत इम्पॅक्ट : 'त्या' विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकं

    nadurbar_school09 डिसेंबर : नंदुरबार जिल्ह्यातील तराडी आश्रमशाळेच्या दुरवस्था उघड झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाला आता जाग आलीये. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत नाशिकचे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त अशोक लोखंडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

    नंदुरबार जिल्ह्यातल्या  शहदा तालुक्यातल्या तराडी गावातील एम.डी सोनावणे आश्रमशाळेच्या गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी दोन प्रकल्पस्तरीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आलीये. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2-3 दिवसांत 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षाजवळ आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. फक्त तराडीच नाही तर नाशिक विभागातल्या सर्व आदिवासी आश्रम शाळांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यामध्ये शाळांची दुरवस्था आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

    संबंधित बातम्या

    » डाळीत पाणी आणि भाकरीच्या खापर्‍या !

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published: