'त्या' एका क्षणानं बदललं आयुष्य, डॉक्टर ते IAS पर्यंत प्रियांका शुक्ला यांचा प्रवास

'त्या' एका क्षणानं बदललं आयुष्य, डॉक्टर ते IAS पर्यंत प्रियांका शुक्ला यांचा प्रवास

छत्तीसगडच्या IAS अधिकारी प्रियांका शुक्ला काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत आहेत.

  • Share this:

रायपूर, 14 मे : छत्तीसगडच्या IAS अधिकारी प्रियांका शुक्ला काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबत त्याही जनजागृती करताना दिसत आहेत. युझर्सकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. पण हे माहीत आहे का त्या IAS अधिकारी होण्यआधी MBBS डॉक्टर होत्या. त्या काळात त्यांच्यासोबत एक प्रसंग घडला आणि त्यानंतर प्रियांका शुल्का यांनी डॉक्टरकी सोडून IAS होण्याचा निर्धार केला होता.

2009 कॅडरमधील IAS अधिकारी असलेल्या प्रियांका शुक्ला 2006 साली लखनऊमधील एका प्रतिष्ठीत केजीयूएम कॉलेजमधून MBBS ची पदवी घेऊन पासआऊट झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली होती. याच प्रॅक्टीसदरम्यान त्या चेकअपसाठी लखनऊमधील एका झोपडपट्टीमध्ये गेल्या असताना एक प्रसंग घडला. तिथल्या भागामध्ये अशुद्ध पाणी येत होतं. तिथे असलेली एक महिला आपल्या मुलीला ते पाणी प्यायला देत होती. हे पाहून शुक्ला यांनी त्या महिलेला टोकलं. अस्वच्छ पाणी प्यायला का देता असे प्रश्न विचारले. असे प्रश्न विचारायला तुम्ही जिल्हाधिकारी आहात का? असा प्रति सवाल या त्रस्त असलेल्या महिलेनं केला.

हे वाचा-Indian Railway ने लॉकडाऊनमध्येही दोन दिवसात 7 लाख 90 हजार प्रवासी पोहोचले गावी

हा प्रसंगानंतर प्रियांका शुक्ला अंतर्मुख झाल्या आणि त्यांना खूप दु:खही झालं. आपला डॉक्टरी पेशा बाजूला ठेवून त्यांनी IAS होण्याचा निर्धार केला. त्यांनी मेहनत आणि जिद्दीनं UPSC परीक्षेची तयारी केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात 2009 साली त्यांना चांगलं यश मिळालं. त्या केवळ अधिकारी म्हणूनच नाही तर याशिवाय त्यांना वेगवेगळे छंदही जोपासले आहेत. त्या उत्तम कविता करतात यासोबतच नृत्याची आवड आहे.

IAS अधिकारी प्रियांका शुक्ला यांचे देशभरात खूप चाहते आहेत. केवळ ट्विटरवरच त्यांचे 70 हजारच्या आसपास फोलोअर्स आहेत. त्यांना आपल्या कामामुळे सेंसर सिल्वर मेडलसह अनेक पुरस्कार मिळवण्याचा बहुमान मिळाला आहे.

हे वाचा-छोट्या करदात्यांना मोठा दिलासा; करकपात कमी, इनकम टॅक्स भरण्याची मुदतही वाढली

First published: May 14, 2020, 7:51 AM IST
Tags: IAS

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading