फक्त 4 तास अभ्यास करून UPSC च्या टॉप 3 मध्ये...जाणून घ्या यशामागची कहाणी
फक्त 4 तास अभ्यास करून UPSC च्या टॉप 3 मध्ये...जाणून घ्या यशामागची कहाणी
अनेकदा आपल्याला म्हटलं जातं की UPSC ची परीक्षा पास होणं ही सोपी गोष्ट नाही. या परीक्षेची तयारी करण्यासाठी साधारण दिवसातले 12 ते 14 तास अभ्यास करावा लागतो.
मुंबई, 21 मे : अनेकदा आपल्याला म्हटलं जातं की UPSC ची परीक्षा पास होणं ही सोपी गोष्ट नाही. या परीक्षेची तयारी करण्यासाठी साधारण दिवसातले 12 ते 14 तास अभ्यास करावा लागतो. असेही काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास चार तास अभ्यास करूनही यश मिळू शकते. आज अशाच एका अधिकाऱ्याची यशोगाथा पाहाणार आहोत. 24 तासांतले केवळ 4 तास अभ्यास करून जुनैद अहमद यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे.
जुनैद हे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एका छोट्या गावातले रहिवासी आहेत. त्यांचे वडील जावेद हुसेन वकील आहेत तर आई आयशा रझा गृहिणी आहे. त्यांचं देश सेवेत जाण्याचं स्वप्न होतं पण त्यांच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्यानं कुणाचं आणि काय मार्गदर्शन घ्यावं हा प्रश्न पडायचा. त्यानं स्वत:यावर संशोधन करून तयारी सुरू केली.
जुनैद यांच्या म्हणण्यानुसार, नागरी सेवांच्या तयारीच्या 10 तास वेळ घालवण्यापेक्षा 4 तास मनापासून काळजीपूर्वक वाचून अभ्यास करा. त्यातून यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत अव्वल यश मिळवलं. त्यांच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
चार वेळा सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिल्यानंतर पाचव्या वेळी परीक्षा यशस्वी झाली. भारतीय महसूल सेवेत प्रथमच निवड झाली. तथापि, जुनैदचे भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न होते. यामुळे, त्याने पुन्हा पाचव्या वेळी परीक्षा दिली आणि सिव्हिल सर्व्हिसेस 2018 च्या परीक्षेत त्यांनी भारतात तिसरा क्रमांक मिळवला.
हे वाचा-दारू विकून मिळालेल्या पैशातून घेतलं शिक्षण, IAS राजेंद्र भारूड यांचा कहाणी
हे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.