अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर सोडणाऱ्या कोण आहेत या महिला?

शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा पार करत भारतात प्रवेश केला. यावेळी पाकिस्तानातून येत असताना त्यांच्यासोबत एक महिला होत्या. या महिला कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 09:59 AM IST

अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर सोडणाऱ्या कोण आहेत या महिला?

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे अखेर भारतात परतले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण देश त्यांच्या या रिअल हिरोची वाट पाहत होता. अखेर शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा पार करत भारतात प्रवेश केला. यावेळी पाकिस्तानातून येत असताना त्यांच्यासोबत एक महिला होत्या. या महिला कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

अभिनंदन यांना सायंकाळीच अटारी-वाघा बॉर्डरवर आणण्यात आलं. पण त्यांचा भारतात प्रवेश पाकने लांबवला. जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी हा प्रवेश लांबल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या सगळ्या कुरापतीनंतर पाकने रात्री 9:15 मिनिटाला अभिनंदन यांना भारताकडे सुपुर्द केलं. यावेळी त्यांच्यासोबत पाकचे काही अधिकारी होते. त्यात एक महिलादेखील होत्या. त्यांचं नाव आहे डॉ. फरिहा बुगती. या महिला पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयातील भारतीय बाबींच्या संचालक आहेत. फरिहा बुगती विदेशी परराष्ट्र कार्यालया (FSP)च्या अधिकारी आहेत.

Loading...

डॉ. फरिहा बुगती भारतीय परराष्ट्र सेवेच्या (IFS)समतुल्य आहेत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणातही त्यांचा सहभाग होता. सध्या, कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. गेल्या वर्षी, जेव्हा जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा फरिहा बुगतीही तिथे उपस्थित होत्या.

त्यामुळे अभिनंदन यांना भारताकडे सुपुर्द करत्यावेळीही पाकिस्तान सीमेवर त्या उपस्थित होत्या.

दरम्यान, याआधीही अभिनंदन यांना पाकिस्तानकडून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यांना मारहाण करतानाचे, त्याचबरोबर त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून प्रश्न विचारण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. असाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले.

अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे तर शनिवारी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...