News18 Lokmat

वाघीणप्रकरणी मनेका गांधींचा संताप, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2018 04:08 PM IST

वाघीणप्रकरणी मनेका गांधींचा संताप, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई, 4 नोव्हेंबर : चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगून या वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

या क्रुर हत्यने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय उत्तर देणार, हे पाहावं लागेल.

प्राणीप्रेमींकडूनही आक्षेप

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केलाय. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील, पण या मोहिमेसंदर्भातील सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीय. दरम्यान, अवनी तर गेली आता तिच्या दोन बछड्यांच काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. मानव आणि वन्यजीव संघर्षातून वाघिणीला जीव गमवाला लागला असल्याचं वन्यजीवप्रेमींनी म्हटलंय.

Loading...


VIDEO : जोडप्याला पोलिसांनी बेदम मारलं, VIDEO झाला व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...