मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मायावतींची मोठी घोषणा

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 02:40 PM IST

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मायावतींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, 20 मार्च : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. मायावती यांनी बुधवारी (20 मार्च)सांगितलं की, 'मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. पण पक्षासाठी संपूर्ण देशभरात प्रचार करेन. आता माझ्या विजयापेक्षा सप-बसपची आघाडी यशस्वी होणं अधिक महत्त्वाचं आहे. मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. पण आता मागासवर्गीयांसाठी लढायचे आहे'.

बुधवारी पत्रकार परिषद घेत मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळेस त्यांनी असंही म्हटलं की, 'भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उत्तर प्रदेशात बसपा, सपा आणि आरएलडीनं आघाडी केली. या आघाडीला थोडंसंही नुकसान पोहोचता कामा नये. त्यामुळे मी निवडणूक जिंकण्यापेक्षा एक-एक जागा जिंकणं अधिक महत्त्वाचं आहे'.

पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'देशातील गरीब, मजूर वर्ग, शेतकरी, बेरोजगार लोक अहंकारी भाजपाला वैतागले आहेत. यासाठी आता मोदी सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. पक्षाचं हित लक्षात घेता मी राज्यसभाचाही राजीनामा दिला होता'.

दरम्यान, भुवनेश्वर येथून 2 एप्रिल रोजी मायावती प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati: I will not contest the Lok Sabha elections. <a href="https://t.co/88oGmtd6Ww">pic.twitter.com/88oGmtd6Ww</a></p>&mdash; ANI UP (@ANINewsUP) <a href="https://twitter.com/ANINewsUP/status/1108262347817275392?ref_src=twsrc%5Etfw">March 20, 2019</a></blockquote>

Loading...

<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...