देश सोडण्याआधी अरुण जेटलींना भेटलो होतो-विजय मल्ल्या

देश सोडण्याआधी अरुण जेटलींना भेटलो होतो-विजय मल्ल्या

. त्यांना कर्जफेडीसाठी एक प्रस्तावही दिला होता असा दावाच मल्ल्याने केलाय

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : कर्जबुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याने लंडनमधील कोर्टाबाहेर धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो असा खळबळजनक खुलासा विजय मल्ल्याने केलाय. तसंच तडजोडीचा प्रस्ताव दिला होता पण त्यावर काही तोडगा निघाला नाही असा दावाही मल्ल्याने केला. मल्ल्याच्या या दाव्यामुळे अर्थमंत्री अरूण जेटली अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एसबीआय बँकेसह इतर बँकांचे नऊ हजार कोटी बुडून विजय मल्ल्या लंडनला पळून गेला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मल्ल्या लंडनमध्ये राहतोय. केंद्र सरकारने विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. लंडन कोर्टानेही विजय मल्ल्याला कोणत्या जेलमध्ये आणि कसं ठेवणार याबद्दल माहिती मागवली आहे.

आज लंडन येथील वेस्टमिंस्टर कोर्टाबाहेर विजय मल्लयाने एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना धक्कादायक खुलासा केलाय. देश सोडून जात असताना आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो होतो. त्यांना कर्जफेडीसाठी एक प्रस्तावही दिला होता असा दावाच त्याने केलाय. त्याच्या या दाव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

जर अर्थमंत्र्यांना विजय मल्ल्या सांगून देश सोडून गेला असेल तर मोदी सरकारला यात सहभागी तर नाही ना असा संशय येतोय. अरुण जेटली आणि नरेंद्र मोदींनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.

दरम्यान, आज विजय मल्ल्या वेस्टमिंस्टर कोर्टात प्रत्यार्पण प्रकरणी हजर झाला होता. यावेळी भारतीय वकिलांनी भारतात कोणत्या जेलमध्ये ठेवणार याबद्दल व्हिडिओ दाखवलाय. आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला.

मी या प्रकरणावर पूर्णपणे वाटाघाटी करण्यास कर्नाटक कोर्टात याचिका केली आहे. मला आशा आहे की न्यायाधीश याचा विचार करतील आणि मला न्याय देतील. मी सर्वांचा हिशेब चुकता करेल हाच मुख्य हेतू आहे असंही मल्ल्याने एनआयए या वृत्तसंस्थेला सांगितलं.

VIDEO : आतापर्यंत कधी न पाहिलेले धावत्या रेल्वेखाली तरुणाचा भयंकर स्टंट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 07:06 PM IST

ताज्या बातम्या