मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /mlc election : सत्यजीत तांबेंच्या खेळीबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

mlc election : सत्यजीत तांबेंच्या खेळीबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

मुळात नाशिकमध्ये हा काँग्रेस अतंर्गत प्रश्न आहे. उगीच त्यात माहविकास आघाडीला गोवले जाऊ नये.

मुळात नाशिकमध्ये हा काँग्रेस अतंर्गत प्रश्न आहे. उगीच त्यात माहविकास आघाडीला गोवले जाऊ नये.

मुळात नाशिकमध्ये हा काँग्रेस अतंर्गत प्रश्न आहे. उगीच त्यात माहविकास आघाडीला गोवले जाऊ नये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काही अडचण निर्माण झाली आहे. तांबे यांच्यावर कारवाईमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे हे ठरणार आहे. अंतिम निर्णय उद्यापर्यंत होईल. पण मला कुणकुण लागली होती मी काँग्रेस वरिष्ठ फोन करून सांगितलं होतं, काळजी घ्या आणि डमी फॉर्म भरून घ्या, असा सल्ला दिला होता, असा खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली.

नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ वाढला आहे. या मुद्दावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.

'काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊन त्यांनी फॉर्म न भरल्याने हे झालं. आम्ही उमेदवारी दिली होती. प्रश्न नागपूर आणि अमरावती राहिला होता. पण अचानक त्यांनी उमेदवारी न भरल्याने हे झालं. त्या मागे काय कारण आहे हे डॉ तांबे सांगू शकतील. तिघांनी बसून एकत्र निर्णय घेतला होता. नागपूर आणि अमरावती बाबत मात्र अजून बैठक व्हावी असे ठरले होते. काही अडचणीमुळे काँग्रेस नेते आले नाही. जागा कुणाला द्यायचं हे आधीपासून ठरले होते, असंही अजितदादा म्हणाले.

(कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी)

'अंतिम निर्णय उद्या होईल. नाशिकबाबत महाविकास आघाडी बैठक नाही. आमची फोनवर चर्चा सुरू आहे. मुळात नाशिकमध्ये हा काँग्रेस अतंर्गत प्रश्न आहे. उगीच त्यात माहविकास आघाडीला गोवले जाऊ नये. समोर भेटल्यावर कळेल खरे काय झालं. मला कुणकुण लागली होती मी काँग्रेस वरिष्ठ फोन करून सांगितलं होतं, काळजी घ्या आणि डमी फॉर्म भरून घ्या, असा सल्ला दिला होता, असा खुलासाही अजित पवारांनी केला.

'विधान परिषद निवडणूक सुरू आहे. नाशिक पदवीधर मध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. आमची चर्चा सुरू आहे. पवार साहेब देखील चर्चा केली आहे. त्यामुळे तिथे आघाडी उमेदवार कोण यावर चर्चा होणार आहे. शुभांगी पाटील पाठिंबा मागितला आहे. पाटील या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटल्या. त्याबाबत काय भूमिका घ्यायची हे ठरेल, असंही अजितदादा म्हणाले.

(sanjay raut : मुख्यमंत्री शिंदेंची दावोसमध्ये मोठी कामगिरी, संजय राऊत म्हणाले...)

'नाशिकमध्ये त्यांना आता संधी मिळाली म्हणून बोलत आहे. त्याला अर्थ नाही. आम्ही बसून मार्ग काढल होता. अधिकृत उमेदवर अर्ज भरला नाही. डॉ तांबे यांच्यावर कारवाई केली असेल मी पण त्यांना विचारणार आहे, असंही अजितदादा म्हणाले.

'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी असे राजकीय पक्षांना वाटते. असे वाटणे आणि प्रत्यक्षात येणे ह्यात फरक आहे. भाजप आक्रमकपणे प्रयत्न करत आहे. शिवसेना पण प्रयत्न करत आहे. आमची राष्ट्रवादी ताकद त्यामुळे आम्ही काँग्रेस आघाडी करायचो. राष्ट्रवादी पक्षाला बरोबर घ्या असे आम्ही विनंती केली होती, असंही अजितदादा म्हणाले.

वंचित आघाडीला अजितदादांना ग्रीन सिग्नल

' प्रकाश आंबेडकर हे, का आमच्यावर शंका घेतात हे मला माहीत नाही. पवार साहेब यांनीच ओपन कॅटेगरी मध्ये पाच लोकांना निवडून आणले होते. 1996-98 च्या निवडणुकीमध्ये निवडून आणले. त्यात प्रकाश आंबेडकर होते. आमचे काही निवडून आले होते. आठवले यांच्या पक्षासोबत आमची युती होती. आम्ही त्यांना पंढरपूरमधून निवडून आणले. त्यानंतर त्यांना शिर्डीत उमेदवारी दिली. पण शिर्डीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांबाबत अशी वक्तव्य करतात, पण आम्ही तसे वागत नाही. असं आमचं मत आहे, असा टोलाही अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.

(sanjay raut : मुख्यमंत्री शिंदेंची दावोसमध्ये मोठी कामगिरी, संजय राऊत म्हणाले...)

आता त्यांना वरिष्ठांनी काही सांगितलं असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमची महाविकास आघाडी असली तर काही लोक आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा करण्यासाठी येतात. काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेतात. काँग्रेसला जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या कोटातून निर्णय घ्यावा. शिवसेनेला जो कोटा दिला आहे, त्यांच्या कोट्यातून त्यांनी मित्र पक्षाला सामावून घ्यावं. राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षाला आपल्या कोट्यात सामावून घ्यावं, असं केलं तर अडचणी येणार नाही, असंही अजितदादा म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या आरोपांमध्ये तथ्य

'आदित्य ठाकरे यांची प्रेस पाहिली. त्यांनी आरोप केले, त्यात तथ्य आहे असे वाटते. आज प्रशासक बसले आहे प्रशासक किंवा नगर विकास यांनी सांगावे. मुद्दे महापालिका आयुक्त काय भूमिका ही मांडली पाहिजे. तिथे लोकप्रतिनिधी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर काम का काढत आहे? असं म्हणत अजितदादांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया

सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, नितीन राऊत यांना महाविकास आघाडी सरकार असताना दावोसला आम्ही पाठवलं होतं. कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री कार्यक्रम असतील तर कुणाला तिथे पाठवायचा हा अधिकार आहे. उदय सामंत आणि एकनाथ शिंदे गेले. राज्याचा फायदा करावा, त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावे. काही लाख मुलांना रोजगार वंचित ठेवले हे घडले हे सत्य आहे, ४५ हजार कोटी MOU होणे आणि प्रत्यक्ष गुंतवणूक येणे तेव्हा कळेल, आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली.

First published:

Tags: Ajit pawar, Nashik, अजित पवार