Home /News /news /

मला गडकरींची काळजी वाटते - शरद पवार

मला गडकरींची काळजी वाटते - शरद पवार

'राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्या सोबत दिसत असले तरी, ते येत्या निवडणुकीत आम्हाच्या सोबत राहतील असे वाटत नाही.'

    विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी 09 फेब्रुवारी : 'केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे माझे चांगले मित्र असून त्यांचे नाव भाजपाकडून पंतप्रधान पदासाठी काही जण पुढे करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, असे होण्याने मला त्यांची काळजी ही वाटते', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. ते सांगोल्यात पत्रकारांशी बोलत होते. पवार यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले, 'ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरी, ते येत्या निवडणुकीत आम्हाच्यासोबत राहतील असे वाटत नाही.' दरम्यान, दोन्ही काँग्रेस आणि मित्रपक्ष जागा वाटपाबाबत बोलताना पवार म्हणाले, '४८ पैकी 44 जागांचे निर्णय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी ही बोलणी सुरू आहेत.' त्यानंतर बारामतीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानीही पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. 'चंद्रकांत पाटील यांनी पवारांनी आपल्या वयाचा विचार करावा,' असं व्यक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना 'माझ्या वयाची त्यांना चिंता आहे, हे एकूण मला समाधान आहे, ते अडवाणींच्याही वयाचा विचार करीत असतील अशी मला खात्री आहे. ते माझ्यापेक्षा वडिलधारी आहेत. त्यांच्या पक्षामध्ये अनेक जण माझ्यापेक्षा वडिलधारी आहेत, असे अनेकजण मी संसदेत बघतो असतो.' असं म्हणत पाटील यांचे हे वक्तव्य पवार यांनी अडवाणींचे नाव घेता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांवर फिरवले. अमित शहा यांनी 45 जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यावर पवार म्हणाले की, 'भाजपला माझ्या शुभेच्छा आहेत. भाजपने 48 जागांची का तयारी केली नाही. लोकशाहीमध्ये कोण काहीही बोलू शकतं. त्यांच्या तोंडाला लगाम घालू शकत नाही.' अशी मिश्कील टिप्पणीही पवारांनी केली. ==============
    First published:

    Tags: Election, NCP, Nitin gadkari, Sharad pawar, नितीन गडकरी, शरद पवार

    पुढील बातम्या