मी सरकारच्या विरोधात नाही तर लोकांच्या बाजूने बोलतो -उद्धव ठाकरे

मी सरकारच्या विरोधात नाही तर लोकांच्या बाजूने बोलतो -उद्धव ठाकरे

हिंदुत्व म्हणून सत्ता मिळवली आणि आता सत्ता संपत आली तरी राम मंदिर बांधत नाहीत, 'मंदिर वही बनाएंगे पण तारीख नही बताएंगे'

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 23 आॅक्टोबर : अनेक वेळा मला विचारलं जातं की तुम्ही सत्तेत असून विरोधात का बोलतात ? पण मी सरकारच्या विरोधात बोलत नाही तर जनतेच्या बाजूने बोलतोय असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पंचांग बघत बसू नये, तत्काळ दुष्काळ जाहीर करावा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

लातूरमध्ये आज शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

नोटबंदी करताना जनतेचा विचार केला का ? पेट्रोल,डिझेल आणि गॅसचे भाव मध्यरात्रीत लागू होतात तर दुष्काळ आणि इतर उपाय योजनानसाठी पंचांग का बघता ? दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री पंचांग काढून बसलेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंचांग न बघता दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

गाजराचं पिक जोरात

राज्यात ठिकठिकाणी दुष्काळ परिस्थिती ओढावलीये आता पिक कोणते येणार असं विचारलं तर उत्तर आलं गाजर, आता गाजराचे पिक जोरात आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. २०२२ ला घरं देणार अशी घोषणा केली खरी पण त्यासाठी पुन्हा तुम्हाला निवडून द्यावे लागणार आणि जेव्हा निवडणूक येणार तेव्हा हीच लोकं सांगितलं असं बोलावं लागतं. अशी कित्येक खोटी आश्वासनं या सरकारने दिली. १५ लाख देणार, ही योजना आणणार, अच्छे दिन येणार पण शेवटी काही आलं नाहीच. त्यामुळे मी तुमच्या खोट्या आश्वासनाचा भागीदार होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

...म्हणून आम्ही सत्तेत !

मी भाषण केल्यानंतर माझं भाषण चांगलं झालं असं सांगतात. पण मी जे बोलतोय ते लोकांना पटतंय की नाही हे महत्त्वाचं आहे. अनेक वेळा शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात का बोलता असं विचारलं जातं. पण मी सरकारच्या विरोधात बोलत नाही तर लोकांच्या बाजूने बोलतो असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आम्ही सत्तेत आहोत पण सरकारमध्ये असून सुद्धा जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही आहोत. मागील सभेतही मीच हेच सांगितलं. सत्तेसमोर मी शेपूट हलवणार नाहीये. सत्ताधारी चुकले तर त्यांच्या पाठीवर शेतकऱ्यांचा आसूड ओढण्यासाठी आम्ही आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिर कधी बनवणार?

हिंदुत्व म्हणून सत्ता मिळवली आणि आता सत्ता संपत आली तरी राम मंदिर बांधत नाहीत, 'मंदिर वही बनाएंगे पण तारीख नही बताएंगे' आता मला तारीख सांगाच असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं.

अयोध्येला जाणारच

राम मंदिराचा प्रश्न मी मुद्दाम हाती घेतला आहे. या सरकारने राम मंदिराचे निव्वळ आश्वासनं दिलं पण पूर्ण केलं नाही. म्हणून येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितलं.

======================================================================

अजगराला जिवंत जाळलं, VIDEO व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 03:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading