मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री - कुमारस्वामी

मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री - कुमारस्वामी

मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री आहे. आम्ही जनतेला पूर्ण जनादेश मागितला होता मात्र तो मिळाला नाही. असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

बंगळुरू,ता.28 मे : मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री आहे. आम्ही जनतेला पूर्ण जनादेश मागितला होता मात्र तो मिळाला नाही. असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. सरकारला काँग्रेसचा पाठिंबा असल्याने प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करावी लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

कुमारस्वामींच्या या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. या वक्तव्यातून कुमारस्वामींची हतबलता दिसून येते अशी टीका भाजपने केली आहे. कुमारस्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. खातेवाटपावरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाल्याने ते पुन्हा राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

कुमारस्वामी सरकारला पूर्ण पाच वर्षांसाठी पाठिंबा देणं काँग्रेसला बंधनकारक नाही असं वक्तव्य शपथ घेतल्यानंतर लगेच काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी केलं होतं त्यामुळं कुमारस्वामी यांच्यावर सतत दबाव ठेवण्याची काँग्रेसची रणणीती असल्याची खेळी असल्याचं बोललं जात आहे.

First published: May 28, 2018, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading