राजीव गांधींच्या नावाचं 'हे' विमानतळ जगातल्या टॉप 10 एअरपोर्टच्या यादीत

राजीव गांधींच्या नावाचं 'हे' विमानतळ जगातल्या टॉप 10 एअरपोर्टच्या यादीत

कतारचं 'हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ' पहिल्या क्रमांकावर

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : AirHelp ने केलेल्या सर्वेक्षणात हैदराबादच्या 'राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा'ने जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत आठवं स्थानं पटकावलंय. तर या यादीत कतारचं 'हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत जपान, टोकियो आणि ग्रीसमधील एथेन्सचं आंतरराष्ट्रीय विमानतळांनीही स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे लंडनचं 'Gatwick' आणि कॅनडातील 'बिली बिशप टोरोंटो सिटी' या विमानतळांची जगभरातील सर्वात वाईट विमानतळांमध्ये नोंद करण्यात आली आहे.


जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 'हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ' ने सगल दुसऱ्यांदा पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत अमेरिकन एयरलाइन्स, एरोमेक्सिको, एसएएस स्कँडिनेव्हियन एयरलाइन्स आणि क्वांटास या एयरलाइन्स टॉप 5 मध्ये समावेश आहे. तर या यादीत रायनियर, कोरियन एअर, कुवैत एअरवेज, युनायटेड किंगडम (यूके) इझीजेट आणि थॉमस कुक एयरलाइन्स यांची घसरण झाली आहे. AirHelp ने केलेल्या या सर्वेक्षणात 2019 चं सर्वात वाईट विमानतळ म्हणून अमेरिकेतील 'न्यू जर्सी हब' ची नोंद करण्यात आली आहे.


गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक


ही आहेत जगातील सर्वोत्तम 10 विमानतळं

1. हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, कतार

2. टोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ, जपान

3. एथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, ग्रीस

4. अफसोस पेना आंतरराष्ट्रीय विमानतळ, ब्राझिल

5. ग्डान्स्क लेच वासा विमानतळ, पोलंड

6. शेरेमीटेवो आंतरराष्ट्रीय विमानतळ, रशिया

7. चांगी विमानतळ, सिंगापूर

8. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारत

9. टेनेरिफ नॉर्थ विमानतळ, स्पेन

10. व्हिराकोपोस / कॅम्पिनास आंतरराष्ट्रीय विमानतळ, ब्राझिल


ही आहेत जगातील सर्वात वाईट 10 विमानतळं

1. लंडन गॅटविक विमानतळ, युनायटेड किंगडम

2. बिली बिशप टोरोंटो सिटी विमानतळ, कॅनडा

3. पोर्टो विमानतळ, पोर्तुगाल

4. पॅरिस ओरली विमानतळ, फ्रान्स

5. मँचेस्टर विमानतळ, युनायटेड किंगडम

6. माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ, माल्टा

7. हेन्री कोंडाइंटरनेशनल एअरपोर्ट, रोमानिया

8. आइंडहोवेन विमानतळ, नेदरलँड

9. कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळ, कुवैत

10. लिस्बन पोर्टेला विमानतळ, पोर्तुगाल


TATA लवकरच लाँच करणार नवी SUV Blackbird; 'ही' आहेत फीचर्स आणिक किंमत


या आहेत जगातील सर्वोत्तम 10 Airlines

1. कतार एअरवेज

2. अमेरिकन एयरलाइन्स

3. एरोमेक्सिको

4. एसएएस स्कँडिनेव्हियन एयरलाईन

5. क्वांटास

6. LATAM एयरलाइन्स

7. वेस्ट जेट

8. लक्झर

9. ऑस्ट्रियन एयरलाईन

10. अमिरात


या आहेत जगातील सर्वात वाईट 10 Airlines

1. अॅड्रिआ एरवेझ

2. एरोलिनस अर्जेंटीनास

3. ट्रान्सव्हिया

4. लॉडमोशन

5. नॉर्वेजियन

6. रायनियर

7. कोरियन एअर

8. कुवैत एअरवेज

9. EasyJet

10. थॉमस कुक एयरलाइन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या