हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच 'या' कारणामुळे पोलिसांनी केला होता एन्काऊंटरचा प्लान

हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच 'या' कारणामुळे पोलिसांनी केला होता एन्काऊंटरचा प्लान

पोलिसांवर प्रचंड दबाव होता. अशात लोकांचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांनी चकमक घडवून आणली आणि आरोपींना ठार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कारानंतर महिला पशुवैद्यकीय डॉक्टरची हत्या आणि त्यानंतर मृतदेह जाळल्याच्या घटनेनंतर लोक संतप्त झाले होते. लोक पोलिसांच्या सुरुवातीच्या कारवाईवर प्रचंड नाराज होते. याशिवाय पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशीर केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता. अशात लोकांचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांनी चकमक घडवून आणली आणि आरोपींना ठार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

एन्काऊंटरचा प्लान!

इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकल यांनी एका अहवालात दावा केला आहे की, घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरवात केली. 30 नोव्हेंबरला वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला. या प्रकरणात पोलिसांव्यतिरिक्त मुख्यमंत्री केसीआर यांच्यावरही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वर्तमानपत्रानुसार, आरोपींना अटक होण्यापूर्वी पोलिस आयुक्त सी.पी. सज्जनार(Cp sajjanar)यांनी आरोपीला धडा शिकवण्यासाठी चर्चा केली होती.

इतर बातम्या - लग्नात डान्सर तरुणीवर झाडली गोळी, घटनेचा VIDEO मोबाईलमध्ये कैद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृत्तपत्राने दावा केला आहे की, सर्वसामान्यांचा रोष शांत करण्यासाठी पोलिस ‘एनकाऊंटर’ सारख्या गोष्टींवरही विचार करत होते. खरंतर, 11 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या वारंगलमध्ये पोलिसांनी अॅसिड हल्ला प्रकरणातील चकमकीत आरोपीला ठार मारलं. त्यावेळी सीपी सज्जनार वारंगलमध्ये एसपी होते. त्यामुळे आताही हा एन्काऊंटर पोलिसांचा प्लान असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - हैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर संशयास्पद, उज्जव निकम यांची प्रतिक्रिया

काय घडले होते 2008 च्या चकमकीत

ही घटना वर्ष 2008 ची आहे. आंध्र प्रदेशातील वारंगल येथे तीन आरोपी पोलीस कोठडीत होते. या तिन्ही जणांवर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांवर अॅसिड फेकल्याचा आरोप होता. पोलिसांनाही इथल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार करायचे होते. येथे हे तीन आरोपी पोलिसांवर अ‍ॅसिड फेकून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी एसपी सीपी सज्जनार हे एकटेच होते.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

Published by: Renuka Dhaybar
First published: December 6, 2019, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading