10 सप्टेंबर : हैदराबाद दुहेरी बाॅम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावलीये. तर एका दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. स्पेशल एनआईए कोर्टाने अनिक सय्यद आणि इस्माइल चौधरीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय दिलाय.
हैदराबादमधील गोकुळ चाट आणि लुंबिनी पार्कमध्ये 2007 साली स्फोट झाले होते. या प्रकरणी अनिक सय्यद इस्माइल चौधरी आणि तारिक अंजुमला कोर्टाने चार सप्टेंबर रोजी दोषी ठरवलं होतं. कोर्टाने आज आपला अंतिम निर्णय देत अनीक सय्यद आणि इस्माईल चौधरीला फाशीची शिक्षा सुनावली. तर तारिक अंजुमला जन्मठेप सुनावलीये. तर इतर दोन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलीये.
2007 साली झालेल्या या स्फोटात 44 जणांचा मृत्यू झाला होता तर 68 जण जखमी झाले होते. तेलंगाणा पोलिसांच्या एन्काऊंटर इंटेलिजेंस शाखेनं या प्रकरणाचा तपास केला आणि पाच आरोपींना अटक केली होती. हे पाचही आरोपी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित दहशतवादी होते.
या पाचही आरोपींविरोधात चार आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तसंच रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ या फरार आरोपींची नावही यात नमूद करण्यात आलीये.
VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा