हैदराबाद गँगरेप-हत्या: नराधमांनी पार केली भोगविलासाची सीमा, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

हैदराबाद गँगरेप-हत्या: नराधमांनी पार केली भोगविलासाची सीमा, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

महिला डॉक्टरच्या डीएनए रिपोर्टनंतर फॉरेन्सिक तपासणीतही नवीन खुलासे समोर आले आहेत.

  • Share this:

हैदराबाद, 14 डिसेंबर : तेलंगणची राजधानी हैदराबाद इथे महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कारानंतर हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. महिला डॉक्टरच्या डीएनए रिपोर्टनंतर फॉरेन्सिक तपासणीतही नवीन खुलासे समोर आले आहेत. आरोपी नराधमांनी डॉक्टर महिलेवर अत्याचार करण्याआधी तिला दारू पाजली होती याची फॉरेन्सिक रिपोर्टनुसार पुष्टी करण्यात आली आहे. डॉक्टरला ठार मारण्यापूर्वी आरोपींनी तिला दारू पिण्यास भाग पाडलं होतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. ते सत्य असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं आहे.

फॉरेन्सिक अहवाल उघड

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक टॉक्सोलॉजीमध्ये असे उघडकीस आले आहे की, डॉक्टर महिलेच्या यकृत टिशूमध्ये दारूचे अंश आढळले आहेत. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी असे सांगितले होते की, आरोपीने डॉक्टर महिलेला बलात्कार करून ठार करण्यापूर्वी दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली होती. पोलिसांच्या या दाव्यांना फॉरेन्सिक अहवालामुळे पुष्टी मिळाली आहे.

काय आहे DNA अहवालात ?

इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, गुरुवारी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरचा डीएनए अहवाल आला. अहवालानंतर हे सिद्ध झाले आहे की, जळलेला मृतदेह महिला डॉक्टरचाच होता आणि हा डीएनए कुटुंबातील सदस्यांशीही जुळतो. डीएनए चौकशीत असेही सांगितले गेले आहे की, घटनेच्या ठिकाणी सापडलेले सेमिनलचे (Seminal Stains)डाग चार आरोपींचे होते. महिला डॉक्टरांच्या शरीरातील हाडे डीएनए चाचणीसाठी पाठविली गेली. याशिवाय पीडित मुलीच्या कपड्यांमधून अंतिम नमुने घेण्यात आले.

इतर बातम्या - हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी आला पीडितेच्या जळालेल्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट

काय झालं होतं त्या रात्री ?

हैदराबादच्या सायबरबाद टोल प्लाझाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह पेट्रोलने पेटवून उड्डाणपुलाखाली फेकण्यात आला. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकांत केशवुलू आणि शिवा अशी 4 आरोपींची नावं होती.

इतर बातम्या - ...नाहीतर हैदराबादसारखी अवस्था होईल, मुंबईतील डॉक्टर महिलेला 2 तरुणांची धमकी

अशा प्रकारे झाला एन्काऊंटर

तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी शस्त्र हिसकावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले की, मोहम्मद आरिफ या आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

मोठी बातमी - राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

सर्वोच्च न्यायालयाचे तपासाचे आदेश

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर चार आरोपींच्या पोलीस चकमकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर हे प्रमुख असतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालदोता आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेन भी यांनाही या आयोगाचे सदस्य केले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

इतर बातम्या - साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 02:00 PM IST

ताज्या बातम्या