हैदराबाद प्रकरण: सीन रिक्रिएट, हल्ला आणि नंतर पोलीस चकमक; रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम

हैदराबाद प्रकरण: सीन रिक्रिएट, हल्ला आणि नंतर पोलीस चकमक; रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम

शुक्रवारी सकाळी जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता तेव्हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे चार आरोपी ठार झाल्याची बातमी समोर आली.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती माध्यमांना दिली आहे. पोलिस आणि आरोपींमध्ये गुरुवारी रात्री उशिरा काय घडलं. त्यांच्यात चकमक कशी झाली. जाणून घेऊयात संपूर्ण घटना....

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर तिला जिवंत जाळून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिस चकमकीत ठार करण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता तेव्हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे चार आरोपी ठार झाल्याची बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस-आरोपींमध्ये ही चकमकी त्याच ठिकाणी घडली जिथे दिशावर(बदललेले नाव) बलात्कार केला गेला.

- हैदराबाद पोलिसांना दिशा (नाव बदललेले) च्या आरोपीची 7 दिवसांची कोठडी मिळाली होती.

- या सात दिवसांत पोलीस चौकशी करणार होते आणि त्याच दरम्यान घटनास्थळावर माहिती मिळवण्यासाठी आरोपींना त्याच ठिकाणी घेऊन गेले जिथे त्यांनी दिशा (नाव बदलले आहे) वर बलात्कार केला आणि जिवंत जाळले.

- पोलिसांचा असा दावा आहे की, घटनास्थळी संपूर्ण घटनेची माहिती मिळवत असताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

- पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी हैदराबाद पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि यात चारही आरोपी ठार झाले.

- ही चकमकी एनएच 44, हैदराबाद येथे झाली.

इतर बातम्या - हैदराबाद आरोपींच्या एन्काऊंटरनंतर पीडितेचे बाबा आणि बहिण म्हणाले...

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hydrabad
First Published: Dec 6, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या