मराठी IPS अधिकारी करणार हैदराबाद Encounterची चौकशी

मराठी IPS अधिकारी करणार हैदराबाद Encounterची चौकशी

माओवाद्यांविरुद्ध कारवाई करत त्यांना शरण आणणं, मानवी तस्करी रोखण्यासाठी उपाय योजना करणं अशी अनेक धडाडीची कामे त्यांनी केली आहेत.

  • Share this:

हैदराबाद 11 डिसेंबर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरण (Hyderabad Gang Rape Murder) सर्व देशभर गाजत आहे. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून पोलिसांना आता अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. सायबराबाद पोलिसांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष SIT नेमण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलीय. तेलंगणा पोलिसांची प्रतिष्ठा या प्रकरणात पणाला लागल्याने हे प्रकरण आता चर्चेच्या केंद्र स्थानी आलंय. त्याचबरोबर या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने सगळ्यांचं लक्ष कोर्टाच्या आदेशाकडे असणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. तर राज्य सरकारने ज्येष्ठ IPS अधिकारी महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली SIT नेमली असून हे मराठी अधिकारी आता हा तपास करणार आहेत.

पंकजा मुंडे यांची नाराजी आताच का आली उफाळून? ही आहेत 3 महत्त्वाची कारणं

एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेवून पोलिसांनी नेमकं काय झालं ते समजून घेतलं होतं. त्यानंतर त्या सर्व आरोपींचं एन्काउंटर करण्यात आलं होतं. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे हे एन्काउंटर घडलं असा दावा पोलिसांनी केलाय. तर जाणीवपूर्वक यांना ठार करण्यात आल्याचा आरोप विवध संघटनांनी केला होता. त्यावरून देशभर प्रचंड वादळ निर्माण झालं होतं.

खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

कोण आहेत महेश भागवत?

महेश भागवत हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे आहेत. पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांची युपीएससीच्या माध्यमातून IPS मध्ये निवड झाली. 1997 ला मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये त्यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नंतर ते आंध्र प्रदेशात आले. 2016 पासून ते तेलंगणातल्या राचकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत.

माओवाद्यांविरुद्ध कारवाई करत त्यांना शरण आणणं, मानवी तस्करी रोखण्यासाठी उपाय योजना करणं अशी अनेक धडाडीची कामे त्यांनी केली आहेत. या कामांमुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 11, 2019, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading