महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची चाकू भोसकून हत्या

महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची चाकू भोसकून हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर हैदराबादच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून टाकली.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 07 डिसेंबर : बुलडाणा जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा इथे 55 वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या चौघांना पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं तर कायद्याची बाजू घेऊन पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला. या सगळ्यात बुलढाण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर हैदराबादच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून टाकली. वासनाधिन नराधमांनी एका युवतीस निर्वस्त्र अवस्थेत फेकून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे आज सकाळच्या सुमारास एका 55 वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

इतर बातम्या - मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

सदर महिला ही खेर्डा येथील लिलाबाई खरात मेंढपाळ असून तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सदर महिलेची ७ डिसेंबरच्या रात्री हत्या करून प्रेत निवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर विवाहीत महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची माहिती घटनेवरून समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.

इतर बातम्या - रिक्षा चालकाने केला चिमुकलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर उपचार सुरू

First published: December 7, 2019, 1:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading