हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेले चौघेजण पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनेचा तपास करताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. पण या सगळ्या घटनेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. महिलेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा पोलीस एन्काऊंटर करणं चुकीचं असल्याचं वृंदा यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, 'एन्काऊंटर नेहमीच बरोबर नसतात. या प्रकरणातील पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी बंदूक हिसकावून पळ काढत होते. अशात कदाचित पोलिसांना गोळ्या झाडण्याचा निर्णय योग्य असावा. आमची मागणी होती की, आरोपींना फाशी देण्यात यावी, परंतु कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत. आम्हाला लवकर न्याय मिळावा अशी इच्छा होती पण ते केवळ संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेद्वारे कारवाई करून. आज लोक एन्काऊंटरमुळे आनंदी आहेत, परंतु आपल्याकडे संविधान, कायदेशीर प्रक्रिया आहे.' असंही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

हैदराबाद पोलिसांकडून यूपी पोलिसांनी शिकलं पाहिजे

या प्रकरणात बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती म्हणाल्या की, बलात्कार करणार्‍यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून शिकले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या पक्षाच्या आरोपी लोकांनाही तुरूंगात पाठवले होते. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

हैदराबाद पोलिसांचे भाजपाने केले कौतुक

भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले, 'हैदराबाद पोलिसांचे आभार, नराधमांशी वागण्याचा हाच मार्ग आहे. आशा आहे की इतर राज्यांतील पोलिसही हे शिकतील.

मोठी बातमी - हैदराबाद प्रकरण: सीन रिक्रिएट, हल्ला आणि पोलीस चकमक; रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.

इतर बातम्या - हैदराबाद आरोपींच्या एन्काऊंटरनंतर पीडितेचे बाबा आणि बहिण म्हणाले...

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 6, 2019, 11:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading