हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी आला पीडितेच्या जळालेल्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी आला पीडितेच्या जळालेल्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट

अहवालानंतर हे सिद्ध झाले आहे की, जळलेला मृतदेह महिला डॉक्टरचाच होता आणि हा डीएनए कुटुंबातील सदस्यांशीही जुळतो.

  • Share this:

हैदराबाद, 13 डिसेंबर : तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली. घटनेच्या 9 दिवसातच पोलीस चकमकीत चारही आरोपींचा मृत्यू झाला. यानंतर अनेकांनी या चकमकीविरोधात प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात आता महिला डॉक्टरच्या जळालेल्या शरीराचा DNA अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, हा डीएनए डॉक्टर महिलेच्या कुटूंबाशी जुळतो.

काय आहे DNA अहवालात ?

इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, गुरुवारी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरचा डीएनए अहवाल आला. अहवालानंतर हे सिद्ध झाले आहे की, जळलेला मृतदेह महिला डॉक्टरचाच होता आणि हा डीएनए कुटुंबातील सदस्यांशीही जुळतो. डीएनए चौकशीत असेही सांगितले गेले आहे की, घटनेच्या ठिकाणी सापडलेले सेमिनलचे (Seminal Stains)डाग चार आरोपींचे होते. महिला डॉक्टरांच्या शरीरातील हाडे डीएनए चाचणीसाठी पाठविली गेली. याशिवाय पीडित मुलीच्या कपड्यांमधून अंतिम नमुने घेण्यात आले. असे म्हटले जात आहे की, तपास अधिकारी आणखी काही अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

इतर बातम्या - संगमनेरमध्ये कापसाचा टेम्पो ओढ्यात पलटला, 3 तरुणांचा जागीच मृत्यू

काय झालं होतं त्या रात्री ?

हैदराबादच्या सायबरबाद टोल प्लाझाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह पेट्रोलने पेटवून उड्डाणपुलाखाली फेकण्यात आला. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकांत केशवुलू आणि शिवा अशी 4 आरोपींची नावं होती.

अशा प्रकारे झाला एन्काऊंटर

तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी शस्त्र हिसकावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले की, मोहम्मद आरिफ या आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

इतर बातम्या - पत्नी जीन्स घालायची म्हणून चढायचा पारा, रागात पतीने आवळला गळा पण...!

सर्वोच्च न्यायालयाचे तपासाचे आदेश

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर चार आरोपींच्या पोलीस चकमकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर हे प्रमुख असतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालदोता आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेन भी यांनाही या आयोगाचे सदस्य केले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 11:04 AM IST

ताज्या बातम्या