हैदराबाद, 04 डिसेंबर : हैदराबादमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यात आरोपींसंदर्भात खळबळजनक माहिती देण्यात आली आहे. आरोपींचं कुटुंब हैदराबादपासून सुमारे 160 किलोमीटर लांब एका गावी राहतं. 7 बीबीसी तेलुगूच्या वृत्तानुसार, एका आरोपीच्या पत्नीने सांगितले की ती 7 महिन्यांपासून गर्भवती आहे. ती म्हणाले की, 8 महिन्यांपूर्वीच या दोघांचे लव्ह मॅरेज झालं होतं. तर आरोपीच्या पत्नीने घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आरोपीची पत्नी म्हणाली की, पीडित एक महिला होती. मला या घटनेबद्दल वाईट वाटतं. पुढे काय होईल हे माहित नसल्याचे तिने सांगितले. पत्नीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला आरोपीचे वडील त्यांच्या प्रेमविवाहासाठी तयार नव्हते, परंतु नंतर ते मान्य झाले.
27 नोव्हेंबर रोजी रात्री आरोपीने 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांना खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचा मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय प्लानिंग केलं याबद्दल पोलिसांनी माध्ममांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे.
महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.
इतर बातम्या - कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, भिंतीवर नोटा चिटकवून दिला 'अंत्यसंस्काराचा खर्च'
दरम्यान, पोलिसांनी तपासातून आरोपींविषयी गंभीर माहिती माध्यमांना दिली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ मागच्या दोन वर्षांपासून विना परवाना ट्रक चालवत होता. सगळ्यात खळबळजनक म्हणजे बलात्काराची ही घटना घडण्याच्या 2 दिवस आधी मोहम्मद आरिफला पोलिसांनी चेकिंग वेळी ताब्यात घेतलं होतं.
व्हायरल बातमी - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!
विना परवाना चालवत होता ट्रक
मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आरिफ एक ट्रक डायव्हर आहे. तो 26 वर्षांचा आहे. रिमांड रिपोर्टनुसार, आरिफला तेलंगाना रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने 24 नोव्हेंबरला महबूब नगर परिसरात वाहन चेकिंहवेळी ताब्यात घेतलं होतं. आरिफकडे गाडी चालवण्याचे कोणतेही परवाने नव्हते. त्यानंतर हाच ट्रक महिला डॉक्टरचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आला.
घटनेच्या 2 दिवस आधी पोलिसांच्या तावडीतून पळाला मुख्य आरोपी
2017पासून आरोपी आरिफ विना परवाना ट्रक चालवत होता. घटनेच्या दोन दिवस आधी आरिफच्या ट्रकमध्ये विटा भरल्या होत्या. हा ट्रक RTOच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या मधे महबूबनगर परिसरात पकडला. पण त्यानंतर ट्रकला सोडून देण्यात आलं. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जर हा ट्रक सोडलाच नसता आणि आरिफवर कारवाई केली असती तर बलात्काराची ही मन हेलावणारी घटना घडली नसती असं पोलिसांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या - ठाण्याच्या पुलावर व्यक्तीने घेतला गळफास, मृत्यूच्या दारातून असे आले परत!
मालकाच्या इशाऱ्यावर रचला कट
परिवहन अधिकाऱ्यांना सुरुवातीला ट्रक ताब्यात घ्यायचा होता, परंतु नंतर आरिफने त्याच्या मालकाला श्रीनिवास रेड्डीला फोन केला. रेड्डीच्या सांगण्यावरून आरिफने ट्रकच्या इंजिनमधून तारा काढून टाकल्या. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ट्रकमध्ये खराबी आहे. त्यामुळे ट्रक घेऊन जाणं अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही म्हणून त्यांनी आरिफला जाऊन दिलं.
अधिकारी तेथून निघून गेल्यानंतर आरिफने ट्रकला महबूबनगरमधील पेट्रोल पंपावर नेले आणि तेथे त्याने सामूहिक बलात्कारात सामील झालेल्या आरोपी मित्र नवीन कुमार आणि चेन्ना केशवल्लू यांना बोलावलं. या सगळ्या माहितीवरून आता पोलिसांनी शमसाबाद येथे राहणाऱ्या ट्रक मालक रेड्डीविरूद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.