हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय नेमणार माजी न्यायाधीश

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय नेमणार माजी न्यायाधीश

या खटल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमणार आहे, जे दिल्लीत राहूनच या घटनेची चौकशी करतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी केली. सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले आहे की, हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होईल, असे कोर्टाने सांगितले.

कोर्टाचे म्हणणे आहे की, तेलंगाना उच्च न्यायालय आधीपासूनच या प्रकरणात सामील आहे. म्हणूनच या खटल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमणार आहे, जे दिल्लीत राहूनच या घटनेची चौकशी करतील.

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी लवकर सुनावणीसाठी अधिवक्ता जी.एस. मणी यांच्या विनंतीस दखल घेतली होती. या चकमकीत सामील असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी होणे आवश्यक असल्याचे मणी यांनी म्हटले होते.

BREAKING: नाराज आहात का? असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...

अशाच प्रकारची याचिका दुसरे वकील मनोहर लाल शर्मा यांनीही दाखल केली होती. शर्मा यांच्या याचिकेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची चौकशी केली पाहिजे. या चकमकी बनावट असल्याचा दावा मणी आणि वकील प्रदीपकुमार यादव यांनी याचिकेत केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करावी.

इतर बातम्या - लेकीची पाठवणी करण्याआधी बापाचाच संसार उद्ध्वस्त, आयुष्याची जमापुंजी जळून खाक!

13 डिसेंबरपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत

तेलंगणा उच्च न्यायालयाने चारही आरोपींचे मृतदेह 13 डिसेंबरपर्यंत संरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालय पुढील सुनावणी 12 डिसेंबर रोजी करणार आहे.

तेलंगणा सरकारनेही एसआयटीची स्थापना केली

दरम्यान, या चकमकीच्या चौकशीसाठी तेलंगणा सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे अध्यक्ष राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम भागवत आहेत.

इतर बातम्या - कृरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hydrabad
First Published: Dec 11, 2019 01:50 PM IST

ताज्या बातम्या