हैदराबाद एन्काऊंटरमागे 'या' IPS अधिकाऱ्याचा हात, वाचा त्यांनीच सांगितलेली INSIDE STORY

हैदराबाद एन्काऊंटरमागे 'या' IPS अधिकाऱ्याचा हात, वाचा त्यांनीच सांगितलेली INSIDE STORY

दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी न्यूज 18 ला दिली आहे.

  • Share this:

बाळाकृष्ण. एम, प्रतिनिधी

हैदराबाद, 06 डिसेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळी तपास करण्यासाठी गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. यामध्ये चारही आरोपी ठार झाले आहे. दरम्यान, आम्ही आरोपींना शरण जाण्यासाठी सांगितले तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी न्यूज 18 ला दिली आहे.

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पहाटे 3.30च्या सुमारास घटनास्थळावरून पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मोठी बातमी - हैदराबाद प्रकरण: सीन रिक्रिएट, हल्ला आणि पोलीस चकमक; रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम

सायबराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, 'आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.'

27 नोव्हेंबरच्या रात्री आरोपींनी पीडितेवर ज्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला आणि तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणावर आरोपींना ठार करण्यात आलं आहे. शादनगर येथील चट्टनपल्ली गावाजवळ बेंगलोर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-44)) पुलाखाली ही चकमक झाली.

इतर बातम्या - हैदराबाद आरोपींच्या एन्काऊंटरनंतर पीडितेचे बाबा आणि बहिण म्हणाले...

स्पेशल ऑपरेशन्स टीमचा समावेश असलेल्या एसआयटीने आरोपींनी चेरलापल्ली येथील मध्यवर्ती कारागृहातून चट्टनपल्ली पुलायाकडे नेले. याच दरम्यान, या चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

हैदराबादचे सिंगम सज्जनार यांच्याबद्दल...

सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी या घटनेत यापूर्वीही एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदारांना निलंबित केलं आहे. सज्जनार हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तसेच, स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजी पदही त्यांनी कामकाज केलं आहे. साबराबदच्या कमिशनरपदी नियुक्ती झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, मुलं आणि महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचं सज्जनार यांनी म्हटलं होतं. जनगाव येथून अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून सज्जनार यांनी आपल्या आपीएस करिअरची सुरुवात केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 6, 2019, 10:06 AM IST
Tags: hydrabad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading