Home /News /news /

मुंबईत लेकीची हत्या करत जोडप्याने घेतला गळपास, WhatsApp वर शेअर केली शेवटची इच्छा

मुंबईत लेकीची हत्या करत जोडप्याने घेतला गळपास, WhatsApp वर शेअर केली शेवटची इच्छा

पती, पत्नी आणि त्यांची मुलगी अशा तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.

    डोंबिवली, 02 मार्च : डोंबिवलीकरांसाठी आजची सकाळी धक्कादायक ठरली आहे. कारण कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावात एका कुटुंबाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पती, पत्नी आणि त्यांची मुलगी अशा तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या अशा कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. वाकलण गावातील ही घटना आहे. शिवराम पाटील असं पती, त्यांची पत्नी दीपिका पाटील आणि मुलगी अनुष्का पाटील अशी मृतांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी दीपिका पाटील हिने चिठ्ठी लिहली आणि त्याचा फोटो काढून आपल्या कुटुंबाला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. त्यावरून आत्महत्येचा प्रकार उघड झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा - PMOमधले हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात - सुब्रम्हण्यम स्वामी दरम्यान, कुटुंबाने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीमध्ये धक्कादायक प्रकार लिहिला आहे. 'कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येस घरातील सगळ्या जणांना जबाबदार धरावं' असं या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर 13 जणांची नावं लिहिण्यात आली आहेत. त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची शेवटची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीमध्ये 13 जणांची नावं लिहिण्यात आली आहे. त्यांना कठोर शिक्षा द्या असं लिहिण्यात आलं आहे. यावर आता पोलीस सगळ्यांची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेऊन आता वेगळ्या बाजूने तपासाला सुरुवात केली आहे. हे वाचा - Delhi Violence: अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कसून चौकशी सुरू पोलिसांनी घटनास्थळावरून, पती, पत्नी आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या संपूर्ण घराची झडती घेत असून शेजाऱ्यांचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, चिठ्ठीमध्ये मालमत्ता आणि संपत्तीविषयीदेखील लिहिण्यात आलं आहे. हे वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टेम्पोचा अपघात, लघुशंकेसाठी गेलेल्या 5 मित्रांचा मृत्यू
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या