पत्नी जीन्स घालायची म्हणून चढायचा पारा, रागात पतीने आवळला गळा पण...!

पत्नी जीन्स घालायची म्हणून चढायचा पारा, रागात पतीने आवळला गळा पण...!

दोघे नवरा बायको कामाला आहेत. मात्र, पत्नी सुजाता जीन्स आणि टी-शर्ट घालते याला पती सुधीर याचा विरोध होता. त्याने या गोष्टीवर तिला वारंवार हटकले होते. त्यामुळे त्यांच्यात या कारणास्तव वाद होत होते.

  • Share this:

प्रदिप भनगे, प्रतिनिधी

डोंबिवली, 13 डिसेंबर : डोंबिवलीमध्ये खूनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी जीन्स टी-शर्ट घालते म्हणून पतीने तिला जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पोलिसांनी पती सुधीर जाधव याला अटक केली आहे.

डोंबिवलीनजीक कोपर परिसरातील राहणाऱ्या सुधीर जाधव यांची पत्नी सुजाता जाधव या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. दोघे नवरा बायको कामाला आहेत. मात्र, पत्नी सुजाता जीन्स आणि टी-शर्ट घालते याला पती सुधीर याचा विरोध होता. त्याने या गोष्टीवर तिला वारंवार हटकले होते. त्यामुळे त्यांच्यात या कारणास्तव वाद होत होते.

सुजाता मंगळवारी रात्री कामावरून घरी परत आली. कपड्यावरून परत पती पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सुधीर याने रागाच्या भरात पत्नी सुजाताचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी सुजाता बेशुद्ध पडली. ती मयत झाल्याचे समजून सुधीर रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी सुजाता हिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचास सुरू आहेत.

दरम्यान, रामनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पतीची पुढील चौकशी पोलीस करत असून उपचार घेत असलेल्या पत्नीचीही चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये खुनाचे धक्कादायक प्रकार समोर आले. साताऱ्यातही एका मुलाने जन्मदात्या आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

लहान मुलांची लग्ने होतात माझं का नाही, असं म्हणत त्याने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

लहान मुलांची लग्न होतात माझं का नाही, असं म्हणत एकाने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला आहे. साताऱ्यातील मोराळे गावात गुरुवारी ही घटना घडली आहे. खून करणारा मुलगा किरण शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आई-लेकराच्या नात्याची 'हत्या', मुलाने केला जन्मदात्रीवरच बलात्कार

दुसरीकडे, आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं आपण नेहमी ऐकतो आणि उदाहरणही देतो. एक आई आपल्या लेकरासाठी सर्वकाही असते. पण, नऊ महिने पोटात ठेवून लहानाचा मोठा केलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि घृणास्पद घटना औरंगाबादेत घडली आहे.

आईच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय 20) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 13, 2019, 8:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading