Valentine Dayच्या आधीच पत्नीला संपवलं, आईच्या हत्येचा घेतला बदला

Valentine Dayच्या आधीच पत्नीला संपवलं, आईच्या हत्येचा घेतला बदला

काही दिवसांनंतर अनंत आणि मयुरी यांनी परभणीमध्ये अजिंठानगरमध्ये आपला संसार सुरू केला. पण...

  • Share this:

परभणी, 13 फेब्रुवारी : शहरातील हडको भागात असलेल्या, अजिंठा नगरमध्ये विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत मयुरी खंदारे या 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा पती अनंत खंदारे याने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

जुन्या वादाचा राग मनात ठेवत अनंतने त्याच्या पत्नीची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मयुरीची हत्या झाल्यापासून अनंत फरार आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

अनंत आणि मयुरी यांनी काही वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. ज्याला मयुरीच्या घरातील लोकांचा विरोध होता.  मयूरीने प्रेम विवाह केल्यानंतर तिच्या घरातल्यांनी अनंतच्या घरी जाऊन हाणमारी केली. यात अनंतच्या आईचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये मयुरीचे वडील आणि आई आजही अटकेत आहेत.

पण काही दिवसांनंतर अनंत आणि मयुरी यांनी परभणीमध्ये अजिंठानगरमध्ये आपला संसार सुरू केला. पण त्यानंतर या दोघांमध्ये असं काही झालं की रागात येत अनंतने जीच्यासोबत प्रेम विवाह केला त्याच पत्नीची गळा दाबून हत्या केली.

आपल्या प्रेमप्रकरणामुळे, आईची हत्या झाली याचा राग अनंतच्या मनात होता आणि त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पण अनंत अद्याप फरार असल्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून मयूरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

VIDEO : 'बेडूक किती फुगले तरी बैल होत नाही,' मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

First published: February 13, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading