पतीने पत्नीच्या क्रेडिट कार्डने केला लाखोंचा खर्च; शेवटी पोलीस ठाण्यात झाली रवानगी

पतीने पत्नीच्या क्रेडिट कार्डने केला लाखोंचा खर्च; शेवटी पोलीस ठाण्यात झाली रवानगी

बायकोच्या क्रेडिट कार्डच्या बापराबरोबरच आणखी एका गोष्टीमुळे पतीला मोठा फटका बसला आहे

  • Share this:

रायपुर, 15 नोव्हेंबर : पत्नीचे पैसे स्वत:चे समजून खर्च करणाऱ्या पतीला पत्नीचे पैसे उडवणे महागात पडलं आहे. पत्नीने पतीविरोधात छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपुरच्या (Raipur) एक पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार दाखल केली आहे. पत्नीने आपल्या पतीविरोधात क्रेडिट कार्डाचा (Credit Card) दुरुपयोग करीत लाखो रुपये करणे आणि परत न दिल्यामुळे तक्रार केली आहे. सर्वोदयनगरमध्ये राहणारी अंकिता सिंह राठोडने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने पती विक्रम सिंह राठोडने आपल्या कंपनीच्या कामासाठी एसबीआय आणि एचडीएफसी बँकेत्या क्रेडिट कार्डचा वापर करीत 3 लाख 75 हजार रुपयांचा खर्च केला.

पत्नीने क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सांगितले तेव्हा पतीने पैसे जमा केले नाहीत. याबाबत दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पत्नीने फिर्याद दाखल केली आहे. खरं तर विजय विक्रमसिंग राठोड हे पत्नी अंकितचे क्रेडिट कार्ड वापरत असत. विक्रम सिंह हे वंदना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत पीआरओ म्हणून काम करतात आणि कंपनीच्या एअर तिकिटांची बुकिंग करण्यासह इतर कामांसाठी आपल्या पत्नीचे क्रेडिट कार्ड वापरत असे आणि कंपनीकडून पेमेंट केल्यावर क्रेडिट कार्डचं बिल भरत नसे.

हे ही वाचा-पतीच्या सुटकेसाठी नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर, जाळला पुतळा

या कारणामुळे झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 लाख 75 हजार रुपये क्रेडिट कार्डची रक्कम परत न भरल्याने विक्रम यांचा पत्नीबरोबर वाद झाला आणि पत्नीने पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात असताना एसएचओनी दोघांनाही आपापसात हा विषय मिटवण्यास सांगितले होते. मात्र पत्नी अंकितसिंग राठोड याला सहमत नव्हती. त्यामुळे महिलेच्या पतीविरोधात कलम 6०6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अमानका पोलीस ठाण्याचे प्रभारी भरत बरेथ यांचे म्हणणे आहे की तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविला गेला असून तपास केला गेला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 15, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या