7 वर्षांच्या मुलीसमोर वडिलांनी घेतला आईचा जीव, चाकूने केले सपासप वार

7 वर्षांच्या मुलीसमोर वडिलांनी घेतला आईचा जीव, चाकूने केले सपासप वार

सगळ्यात धक्कादायक म्हणजे घटनेच्या वेळी जयाची 7 वर्षीय मुलगी तिथे हजर होती. वडिलांचे हे क्रूर रूप पाहून ती प्रचंड घाबरली.

  • Share this:

वाशिम, 20 फेब्रुवारी : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर 7 वर्षीय मुलीसमोर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील गोपाल नगर परिसरातील आदर्श नगरात घडली. जया कमलेश घुले असं मृत महिलेचं नाव असून आरोपी पती कमलेश हा अद्याप फरार आहे.

वाशिमच्या कमलेश घुलेचा 10 वर्षापूर्वी अमरावतीमध्ये राहणाऱ्या जयासोबत विवाह  झाला होता. लग्नानंतर एका वर्षाने कमलेश हा सुरतमध्ये गेला. तो तिथे पेंटिंगचा काम करत होता. त्यामुळे जया ही आपल्या माहेरी अमरावती जिल्ह्यातील आदर्श नगरात आपले वडील एकनाथ पांडुरंग बघेकर यांच्याकडे राहत होती.

कमलेशचं सासरी अधून-मधून येणं-जाणं सुरू होतं. १६ फ्रेब्रुवारीला कमलेश आपल्या सासरी आला. तेव्हा जयाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी जया आपल्या 4 वर्षीय मुलगा आणि 7 वर्षीय मुलीसह एकटीच होती. या दरम्यान नेहमी प्रमाणे दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला.

तेव्हा कमलेशने दारूची बाटली काढली बाथरूममध्ये जाऊन त्याने दारू प्यायली. आणि  मद्यधुंद अवस्थेत जयाचे केस पकडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चाकूने जयावर वार केले.

हेही वाचा : लग्नानंतर काय होईल याचा विचार जवानाची पत्नी करत नाही, ऐका शहीदाची पत्नी काय म्हणते

सगळ्यात धक्कादायक म्हणजे घटनेच्या वेळी जयाची 7 वर्षीय मुलगी तिथे हजर होती. वडिलांचे हे क्रूर रूप पाहून ती प्रचंड घाबरली. तेथून तिने पळ काढला. आरडा-ओरड करत शेजारचे लोक जमवले. मात्र तोपर्यंत कमलेश पळून गेला.

शेजारच्या लोकांनी त्याच्या वडिलांना बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

जयाचे आई-वडील यांच्या तक्रारीवरून आणि मृत जयाच्या 7 वर्षाच्या मुलीच्या सांगण्यावरून अमरावतीच्या राजपेठ पोलिसांनी भादंवि ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तर पोलीस आरोपी कमलेशचा कसून शोध घेत आहे.

कमलेशला दारूचं व्यसन लागलं होतं. पत्नी जयासोबत त्याचा कौटुंबिक वाद झाला आणि या वादातून त्याने तिचा जीव घेतला. माझ्या देखत माझ्या आईला मारलं. माझ्या त्या बापाला फाशी द्या असं 7 वर्षाची मुलगी बोलत आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO : लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, नराधमाचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद

 

First published: February 20, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या