मुंबई हादरली! अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने क्षणात संसार संपवला, पतीची चाकू भोसकून हत्या

मुंबई हादरली! अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने क्षणात संसार संपवला, पतीची चाकू भोसकून हत्या

नालासोपारा पूर्वेकडील गालानगर नागेला तलावाजवळ ओमसाई इमारतीमध्ये सुनील कदम हा आपल्या पत्नी मुलांसोबत राहत होता. मात्र, त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी प्रणाली हिने सुनीलच्या गळ्यावर, छातीवर वार करून त्याला घायाळ केलं.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

मुंबई, 22 ऑगस्ट : नालासोपारा पूर्वेकडील गालनगर इथे पत्नीने पतीला भोसकून ठार केल्याची घटना घडली आहे. यात पती सुनील कदम याचा मृत्यू झाला आहे. पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पत्नीला तुळींज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील गालानगर नागेला तलावाजवळ ओमसाई इमारतीमध्ये सुनील कदम हा आपल्या पत्नी मुलांसोबत राहत होता. मात्र, त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी प्रणाली हिने सुनीलच्या गळ्यावर, छातीवर वार करून त्याला घायाळ केलं. त्याला उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी / 02मध्ये सुनील कदम (36) याचे त्याच्याच कंपनीमध्ये कामाला असलेल्या प्रणाली (33) सोबत प्रेमप्रकरण असल्यानं घरच्यांना सांगून घरच्यांनी 2011मध्ये दोघांचं लग्न लावून दिलं होतं. लग्न झाल्यानंतर दोघांना सहा आणि एक वर्षाच्या दोन मुली आहेत. आई, वडील आणि आजी या परिवारासोबत ते राहत होते.

इतर बातम्या - पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी!

पत्नी प्रणाली हिने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देऊन पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तुळींज पोलिसांनी घरातील सर्वांना चौकशी करिता ताब्यात घेतलं. सुनीलच्या वडिलांनी तुळींज ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर पत्नीने हत्या केल्याचं कबूल केलं.

पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्यामूळे हत्या केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी सांगितलं. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी पत्नी प्रणाली हिला अटक केली असून अन्य काही कारणे आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

शहरात मॉर्निंग वॉकला आले भल्ले मोठे अस्वल, पुढे काय घडलं? पाहा हा VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading