पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीने गळा आवळून केली हत्या

पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीने गळा आवळून केली हत्या

उल्हासनगरच्या मुकुंदनगर भागातील ही घटना आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. घरात कोणी नसल्याचं पाहत गळा आवळून तिची हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 07 एप्रिल : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रेम संबंधातून अशा पद्धतीने गुन्हेगारी वाढल्याने स्थानिकांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उल्हासनगरच्या मुकुंदनगर भागातील ही घटना आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. घरात कोणी नसल्याचं पाहत गळा आवळून तिची हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पती दिपक पगारेला ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मृत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता याचा प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

खुनाच्या या प्रकरणात आणखी सखोल तपास करण्यासाठी पोलीस आरोपी पतीची कसून चौकशी करत आहेत. तर अधिक माहितीसाठी शेजाऱ्यांचीही आणि कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


VIDEO: तावडेंची हिम्मत असेल तर...मनसे नेत्याचं खुल्लं चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या