शारीरिक छळामुळे महिलेची पोलिसांत तक्रार, रागात पतीने गळा आवळून पत्नीला संपवलं

शारीरिक छळामुळे महिलेची पोलिसांत तक्रार, रागात पतीने गळा आवळून पत्नीला संपवलं

कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 18 जून : कौटुंबिक वादातून गुन्हा घडण्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना उमरखेड तालुक्यातील नागेश्वडी इथं उघडकीस आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे उमरखेड तालुका हादरला आहे.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 16 वर्षापूर्वी सुनीता नावाच्या महिलेचा विवाह दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील गजानन दुथडे याच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. कालांतराने गजानन हा सुनीताला शारीरिक त्रास देऊ लागला. त्यावरून सुनीताने वडीलांकडे राहायला गेली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.

दोघांची न्यायालय परिसरात भेट झाली. गजाननने त्यावेळी तिला सोबत घेऊन गेला आणि नागेश्वर वाडीजवळ गळा आवळून सुनीताची हत्या केली. त्यानंतर गजानने सुनीताचा मृतदेह दाहगाव शिवारात टाकून पसार झाला.

यासंदर्भात पोलिसांना सुनीताचा मृतदेह सापडला. त्यानंतर पुढील तपासात पती गजानन यानेच पत्नी सुनीताची हत्या केली असल्याचं उघड झालं. पोलिसांनी गजाननला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 08:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading