पतीनेच पुसलं पत्नीचं कुंकू, ज्याच्यासोबत पळून गेली त्याचा 'असा' केला खेळ खल्लास!

पतीनेच पुसलं पत्नीचं कुंकू, ज्याच्यासोबत पळून गेली त्याचा 'असा' केला खेळ खल्लास!

कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडय़ात राहणारा अजित बिडलान याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्याचा भाऊ राजीव ओमप्रकाश बिडलान 21 ऑक्टोबर 2019 रोजी पासून बेपत्ता आहे.

  • Share this:

डोंबिवली, 14 डिसेंबर : एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर तिची पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र, केवळ बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलिसांनी मोठ्य़ा शिताफीने तपास करून बेपत्ता झालेल्या व्यक्तिची हत्या करण्यात आली असल्याचं उघड केलं आहे. या प्रकरणात तीन जण अटकेत असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचे खानावळीतल काम करणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून राजीव बिडलान या तरुणाची हत्या करण्यात आली होती. प्रियसी महिलेच्या पती आणि नातेवाईकांनी मिळून ही हत्या केली आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडय़ात राहणारा अजित बिडलान याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्याचा भाऊ राजीव ओमप्रकाश बिडलान  21 ऑक्टोबर 2019 रोजी पासून बेपत्ता आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. राजीव कोणाच्या संपर्कात होता या अंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. राजीव हा रुग्णवाहिकेवर चालकाचे काम करीत होता. तो ज्या खानावळीत जेवण करीत होता. त्याच खानावळीत राहत होता. खानावळीत रुपा संजित जैसवार ही काम करीत होती.

इतर बातम्या - साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

राजीवचे रुपाशी अनैतिक संबंध होते. याच दरम्यान राजीव व रुपा दोघेही कल्याणमधून पळून गेले. बाहेर गावी राहिल्यानंतर ते दोन महिन्यांनी  पुन्हा कल्याणमध्ये रुपाच्या घरी आले आणि त्याठिकाणी राहू लागले. त्यानंतर राजीव हा बेपत्ता झाला. रुपाचा पती संजित जैसवार, पुतण्या उत्तम जैसवार, सावत्र भाऊ संदीप  गौतम आणि मित्र राहूल रमेश लोट यांनी राजीवला जास्त प्रमाणात दारू पाजून रिक्षाने फिरवले. त्यानंतर छातीत धारदार हत्यार खूपसून त्याला जीवे ठार मारले.

इतर बातम्या - फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, जेवणही घश्याखाली जाईना!

हत्या केल्यानंतर राजीवचा मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्याच्या हद्दीतील वालशिंद गावातील झाडीत फेकून दिला. बेपता झालेल्या राजीवचा शोधात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हाचा छडा लावला आहे. या प्रकरणाता आता आरोपींची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

इतर बातम्या - देशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात, 'भारत बचाव' रॅलीतून दाखवणार ताकद

Published by: Renuka Dhaybar
First published: December 14, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading