ऋतिक रोशनची चाहती होती पत्नी, पतीने गळा कापून केली हत्या आणि नंतर...

पत्नीला अभिनेता हृतिक रोशनवर प्रेम होतं. तिला तो आवडतो म्हणून पतीने तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

न्युयॉर्क, 11 नोव्हेंबर : बॉलीवूड स्टार्ससाठी चाहत्यांचं हटके प्रेम सगळ्यांनीच पाहिलं आहे. बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रीसाठी अनेकदा चाहत्यांनी प्रेमाची सीमा ओलांडली. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनवरच्या प्रेमामुळे एका महिलेवर मृत्यू ओढावला आहे. न्यूयॉर्क शहरातील ही घटना आहे. पत्नीला अभिनेता हृतिक रोशनवर प्रेम होतं. तिला तो आवडतो म्हणून पतीने तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली आहे.

न्यूयॉर्कमधील क्वीन्स होममध्ये राहणाऱ्या दिनेश्वर बुद्धीदत्त (33 वर्षे) यांनी शुक्रवारी रात्री पत्नी डोन्ने डोजॉय हिचा खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर दिनेश्वर हॉवर्ड बीचमधील शेतात गेला आणि झाडाला गळफास लावून घेतला. या दाम्पत्याचे चार महिन्यांपूर्वी जुलैमध्येच लग्न झाले होते. त्यांच्या अशा कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या बहिणीला पाठवला हत्येचा मेसेज

आत्महत्येपूर्वी दिनेश्वरने स्वत: डोन्ने हिच्या बहिणीला निरोप देऊन हत्येची माहिती दिली. घराची चावी भांड्याखाली ठेवल्याचेही मेसेजमध्ये सांगितलं. बुधवारी, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी, दिनेश्वरने कोर्टात आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानंतर दिनेश्वरच्या संरक्षणासाठी कोर्टाकडून संरक्षणाचा आदेश देण्यात आला होता.

इतर बातम्या - धक्कादायक! परीक्षेसाठी आलेल्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

चौकशी दरम्यान डोन्नेच्या मित्राने सांगितले की, याआधीदेखील बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन पत्नीचा क्रश असल्यामुळे दिनेश्वरने डोन्नेवर हल्ला केला होता. या सगळ्या माहितीच्या आधारे पोलीस सध्या पती-पत्नीच्या मृत्यूचा शोध घेत आहेत. यामध्ये डोन्ने आणि दिनेश्वरच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहेत.

डोन्ने जेमिनी अल्ट्रा लाऊंजमध्ये बार टेंडर होती. डोन्नेनं हृतिकवरील क्रशमुळे तिच्या नवऱ्याच्या हिंसक वागण्याबद्दल शेजारच्या महिलेला सांगितलं होतं. डोन्नेचे पती हृतिकवर खूप जळायचा, असंही तिने सांगितलं होतं. डोन्ने जेव्हा जेव्हा हृतिकचा चित्रपट पाहायची तेव्हा दिनेश्वर टीव्ही बंद करायला सांगायचा. हृतिकवरचा राग आणि पत्नीचं त्याच्यावरचं प्रेम एक दिवस दिनेश्वरच्या डोक्यात गेलं आणि त्याने पत्नीची हत्या केली. आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं.

इतर बातम्या - #MaharashtraPolitics : महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

First published: November 11, 2019, 9:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading