पैशांसाठी पतीने संपवलं सात जन्माचं नात, 2 मुलंही झाली अनाथ

सध्याचं जग हे पैशावर चालतं असं म्हणतात ते काही खोटं नाही आहे. सोलापुरात याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. पैशासाठी पतीने पत्नीची हत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 02:21 PM IST

पैशांसाठी पतीने संपवलं सात जन्माचं नात, 2 मुलंही झाली अनाथ

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 27 डिसेंबर : सध्याचं जग हे पैशावर चालतं असं म्हणतात ते काही खोटं नाही आहे. सोलापुरात याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. पैशासाठी पतीने पत्नीची हत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बरं इतकंच नाही तर, पत्नीनेच आत्महत्या केल्याचा बनाव पतीने रचून पोलिसांनी फसवण्याचा प्रयत्न केला. पैशासाठी पती रोज पत्नीला मारायचा आणि मारून-मारून पत्नीची हत्या केली असल्याचा आरोप मृत पत्नीच्या भावाने केला आहे.

मनीषा दत्तात्रेय नागटिळक असं मृत महिलेचे नाव आहे. या महिलेला 2 मुलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुंभेज गावातील ही घटना आहे. पत्नीला मारल्यानंतर पतीने तिला घराच्या फॅनला लटकवून आत्महत्या केली असल्याचा कट रचला.

या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. तर आपल्या आईच्या जाण्याने 2 चिमुकली मुलं पोरकी झाली. या सगळ्यामुळे कुंभेज गावात शोककळा पसरली आहे.

Loading...


VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...