क्षणात संपलं सात जन्माचं नातं, झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा आणि...!

क्षणात संपलं सात जन्माचं नातं, झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा आणि...!

नवऱ्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून खेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 13 ऑक्टोबर : सध्या गुन्हेगारीने कहर केला आहे. उस्मानाबादमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून खेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे बायकोची हत्या करून पतीने स्वत:लाही गळफास लावून घेतला आत्महत्या केली आहे. रामभाऊ परीट आणि सीताबाई परीट अशी या मयत पती-पत्नींची नावं आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पत्नीची निर्घृण हत्या आणि त्यानंतर पतीची आत्महत्या या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पण या गुन्ह्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संपूर्ण प्रकारासंदर्भात शिराढोन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बरं ही घटना काही घरात घडलेली नाही तर सगळा प्रकार शेतात घडला. त्यामुळे सकाळ होताच हा गंभीर प्रकार उघडकीस आला. सकळाच्या सुमारास गावकऱ्यांनी एककीडे पत्नीचा मृतदेह तर दुसरीकडे पतीचा मृतदेह आळून आला. यानंतर गावात एकच बोंब उडाली.

पोलिसांना या संदर्भात सांगण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे. ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर सात जन्माच प्रेमळ नात एका क्षणात यांनी का संपवलं याचा आता पोलीस तपास घेत आहे.

तर या हत्येमुळे परीट कुटुंबात शोककळा पसरली आहे तर संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

VIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2018 04:18 PM IST

ताज्या बातम्या