खळबळजनक, पत्नीची हत्या केल्याचं मुलीला फोन करून कळवलं आणि...!

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2018 05:06 PM IST

खळबळजनक, पत्नीची हत्या केल्याचं मुलीला फोन करून कळवलं आणि...!

रवी जैसवाल, प्रतिनिधी

जालना, 22 ऑक्टोबर: जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका क्षणात पतीने आपलं सात जन्माचं नात संपवत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बदनापूर शहरात राहणारे मयत भाऊसाहेब भोसले यांनी रात्री आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यात त्यांच्या पत्नी कुशिवर्ता भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भाऊसाहेब भोसले याने पत्नीची हत्या करून नंतर रात्रीच्या सुमारास जवळच असलेल्या रेल्वे ट्रकवर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र भाऊसाहेब यांनी आपली मुलं असताना एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे मयत भाऊसाहेब भोसले यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मुलीला फोन केला आणि आपण पत्नीची हत्या केल्याच सांगितलं आणि त्यानंतर स्वत: रेल्वेखाली जीव दिला.

Loading...

दरम्यान, मयत पती-पत्नीच्या मुलीच्या फिर्यादीवरून या प्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाऊसाहेब यांनी पत्नीची हत्या करण्यामागे काय कारण होतं याचा आता पोलीस वेगळ्या पद्धतीने शोध घेत आहे.

तर आपल्या आई-वडिलांना अशा पद्धतीने गमावल्याने भोसले कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं आहे. तर परिसरातूही यावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुम्ही मृत्यू जवळून पाहिलात का? नसेल तर नक्की पाहा हा VIDEO

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2018 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...