विकृतीचा कळस! विवाहबाह्य प्रेमाला नकार दिल्यामुळे पत्नीच्या गुप्तांगात दुचाकीचं हँडल टाकलं

प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेऊ नको असं सांगितल्यानंतर चिडलेल्या पतीने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगामध्ये बेल्टचा बक्कल टाकला. अशी माहिती पीडित महिलेकडून देण्यात आली होती. पण ...

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 01:43 PM IST

विकृतीचा कळस! विवाहबाह्य प्रेमाला नकार दिल्यामुळे पत्नीच्या गुप्तांगात दुचाकीचं हँडल टाकलं

इंदौर, 14 मे : पत्नीने प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीने तिच्या गुप्तांगामध्ये बेल्टचा बक्कल घातला ही बातमी आपण मंगळवारी वाचलीच असेल. पण त्यात आता एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. नराधम आणि निर्दयी पतीनं पत्नीच्या गुप्तांगात बेल्टचा बक्कल नाही तर दुचाकीचा हँडलं घातल्याचं समोर आलं आहे. हे वाचल्यानंतर तुमचे विचार बंद होतील पण हा मन हेलावून टाकणारा प्रकार मध्य प्रेदशच्या इंदौरमध्ये घडला आहे. यासंपूर्ण प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेऊ नको असं सांगितल्यानंतर चिडलेल्या पतीने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगामध्ये बेल्टचा बक्कल टाकला. अशी माहिती पीडित महिलेकडून देण्यात आली होती. पण बुधवारी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये तिच्या पोटातून डॉक्टरांनी दुचाकीचा हँडल काढल्याची माहिती देण्यात आली आहे.

महिलेने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, पतीने मला खूप मारहाण केली. त्याने मला बेल्टने मारलं अशी माहिती देण्यात आली आहे. रात्रभर महिला वेदनांनी विव्हळत होती पण पतीने तिला मदत केली नाही. उलट सकाळी तिला दारू पाजून तिला आणखी मारहाण केल्याचंही सांगण्यात आलं होतं.


हेही वाचा : सुरक्षा आहे कुठे? मुंबईच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर बलात्कार

Loading...

शरमेपोटी महिलेने हा गंभीर प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण 1 वर्षानंतर महिलेच्या पोटात इंफेक्शन झालं. त्यानंतर तिला एम वाय या रुग्णालयात भरती केलं गेलं. यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर डॉक्टरांच्या मोठ्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली. तेव्हा तिच्या पोटातून दुचाकीचा हँडल बाहेर काढण्यात आला. पत्नीने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात गेले असता महिलेच्या शरीराचा खूप दुर्घंध येत होता. तिचं पोट खूप फुगलं होतं. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'आदिवासी असल्यामुळे मी आणि माझा पती आम्ही दोघेही दारू पितो. पण लग्नानंतर पती एका मुलीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने मला रोज मारहाण केली. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा आम्ही दोघांनी दारू प्यायली होती. मला बेल्टने मारताना बेल्टचा बक्कल तुटला. रागाच्या भरात निर्दयीपणे त्याने तो माझ्या गुप्तांगाद टाकला. मी खूप ओरडले पण त्याने माझ्य़ावर दया दाखवली नाही.'

महिला पुढे म्हणाली की, 'मी बक्कलचा तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमलं नाही. पण तरीदेखील पतीने मला खूप मारहाण केली आणि मला आणखी दारू पाजली. यानंतर त्याने मला घरातून हकलून दिलं.' महिलेने दिलेल्या या कबुलीनंतर आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


VIDEO: बैलाला वाचवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...