कशाला दारू सुरू केली? दारूड्या नवऱ्याला घेऊन महिला पोहोचली पोलीस स्टेशनला!

कशाला दारू सुरू केली? दारूड्या नवऱ्याला घेऊन महिला पोहोचली पोलीस स्टेशनला!

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने सुरू होताच सुखी संसाराला पुन्हा ग्रहण लागले आहे.

  • Share this:

राजगुरूनगर, 06 मे : लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरातच बसून सुखी संसारात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण, आता लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात  दारूची दुकाने सुरू होताच सुखी संसाराला पुन्हा ग्रहण लागले आहे. नवऱ्याने दारू पिऊन एका महिलेला बेदम मारहाण केली. त्यामुळे या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली व्यथा मांडली.

राजगुरुनगर इथं दारू पिऊन नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने महिलेने नवऱ्याल्या थेट पोलिसांत आणले आणि कशाला ही दारू सुरू केली, असा सवाल करत आपल्या भावना या पीडित महिलेने व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करुन बाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे.

हेही वाचा - पुण्यात कुठल्या परिसरात किती रुग्ण? संपूर्ण आकडेवारीसह MAP पाहाच!

मात्र,  दारू दुकाने सुरू झाल्याने अनेक तळीराम आता मोकाटच झाली आहे.  दारुच्या नशेत घरातील महिलांना मारहाणीच्या घटना घडत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी मोलमजुरी करत परजिल्ह्यातील हे कुटुंब राजगुरुनगर परिसरात वास्तव्यास आहे. मोलमजुरी करुनही लॉकडाऊनच्या काळात दीड महिना घरात सुखी संसार सुरू होता. मात्र, राज्यात दारुची दुकाने सुरू झाली आणि तळीरामांची पावलं दारूच्या दुकानाकडे वळली. दारूच्या नशेत नवऱ्याने या महिलेला बेदम मारहाण केली.

हेही वाचा - चीनला मोठा झटका, भारताला विश्व गुरू बनवण्यासाठी पंतप्रधानांचा प्लॅन तयार

अखेर या महिलेनं राजगुरूनगर पोलीस स्टेशन गाठले. आपल्या नवऱ्याला फरफटत नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या  नवऱ्याला ताब्यात घेतलं असून तक्रार दाखल केली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 6, 2020, 1:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या