चंद्रपूर, 06 सप्टेंबर: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. मात्र हेच प्रेम युद्धात बदललं तर गुन्हा घडायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur Crime) किन्ही गावात घडली आहे. काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्यात झालेल्या वादामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे.
सुषमा मनोज कन्नाके असं मृत महिलेचं नाव आहे. पती मनोज कन्नाके हा आरोपी आहे. मनोजसोबत सुषमाचे नेहमीच क्षुल्लक कारणांवरून वाद व्हायचे.
हे वाचा - स्कूटर घेऊन गेला अन् नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक शेवट
काही वेळा वाद विकोपाला गेल्यानंतर मनोज सुषमाला मारहाण करत होता. मात्र 2 सप्टेंबरला या दोघांमधील वाद विकोपाला गेला. आणि मनोजनं सुषमाला जबर मारहाण केली.
या मारहाणीमध्ये सुषमाला इजा झाली. तिला लगेच सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं. अनेक दिवसांच्या उपचारानंतर सुषमाची अखेर प्राणज्योत मालवली. मात्र या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. तसंच मनोजविरुद्ध संतापाची लाट आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.