देवास, 30 मार्च : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पायी चालत जाणारी एक महिलाा अचनक बेशुद्ध पडली. तिथून जाणाऱ्या मध्य प्रदेश पोलिसांनी या महिलेला उचलून उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. उपासमार आणि थकवा यामुळे महिलेची अवस्था वाईट झाली होती. कोरोनामुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. कोणतंही वाहन नसल्यानं ही महिला पायी चालत निघाली होती. बेशुद्ध झाली तेव्हा महिलेची प्रकृती गंभीर होती आणि तिला रक्ताची गरज असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता एका पोलीस कॉन्स्टेबलनं या मजूर महिलेचा आपलं रक्त देऊन जीव वाचवला.
देवास इथे राहणारी महिला अनेक दिवसांपासून उपाशी होती. त्यामुळे अशक्तपणा आला होता. असे असतानाही ती राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी पायी चालत जात होती. लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक बंद होती. त्यामुळे चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉकडाऊनमुळे मजुरीही बंद झाली होती. अशा परिस्थितीत खायला पैसे नव्हते. त्याच विवंचनेत असलेली महिला भर दुपारी रस्त्यात चक्कर येऊन पडली. त्यावेळी तिला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
VIDEO : नर्सने सांगितली मुंबईतल्या पहिल्या Corona रुग्णाची अवस्था कशी होती?
महिलेला रुग्णालयात रक्ताची गरज असल्याचं समजलं तेव्हा कॉन्स्टेबल धर्मेंद्र ताबडतोब तयार झाला. त्याने रक्त लगेच त्या महिलेसाठी रक्त दिले. तातडीने रक्त मिळाल्यामुळे महिलेचे प्राण वाचले. रक्त मिळण्यास उशीर झाला असता तर महिलेचा जीव धोक्यात होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
हे वाचा : डॉक्टरचं महिलेसोबत अश्लील वर्तन, पाहा रुग्णालयातील धक्कादायक CCTV VIDEO मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.