रोजगार देतो असं सांगून लाखोंची फसवणूक, संतप्त महिलांनी फोडलं ऑफिस

रोजगार देतो असं सांगून लाखोंची फसवणूक, संतप्त महिलांनी फोडलं ऑफिस

गुंतवणूक करून स्वंयरोजगाराच्या माध्यमातून घर बसल्या महिन्याला 10 ते 15 हजार रुपये कमवा अशी जाहिरात करून महिलांना घातला गंडा.

  • Share this:

बब्बू शेख, मनमाड 30 ऑगस्ट : स्वंयरोजगार उपलब्ध करून देण्याचं अमिष दाखवून एका कंपनीनं महिलांना लाखोंचा गंडा घातलाय. मनमानड शहरात ही धक्कादायक घटना उघडकीय आलीय. यात शेकडो महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक झाली असून मनमाड शहरात खळबळ उडालीय. महिलांची फसवणूक झाल्याचं कळताच संतप्त महिला आणि नागरिकांनी फसवणूक करणाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी  फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. यात एका महिलेचाही समावेश आहे.

एस. मार्क नावाच्या कंपनीने शहरातील आझाद रोडवर एका कॉम्पलेक्समध्ये मोठं ऑफिस थाटलं होतं. गुंतवणूक करून स्वंयरोजगाराच्या माध्यमातून घर बसल्या महिन्याला 10 ते 15 हजार रुपये कमवा अशी जाहिरात केली होती   पेंसिल, फुलवाती, लॉग वाती व पेपर बॅगसह घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी कंपनीकडून कच्चा माल व मशीन उपलब्ध करून देण्याचं आमीष दाखविण्यात आलं.

कॉलेजच्या स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

त्यासाठी महिलाकडून नाव नोंदणीसाठी अडीच हजार तर मशीनच्या बुकिंग करिता 20 हजार रुपये घेण्यात आले मात्र वारंवार चकरा मारून देखील कच्चा माल व मशीन मिळत नसल्याचं पाहून आपली फसवणूक झाल्याचं महिलांच्या लक्षात आलं व त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. उद्या पैसे परत देऊ असे सांगून आज संचालकानी कार्यलयाला कुलूप लावून पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

या आधीही अनेक शहरांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. जास्त पैसे मिळावे यासाठी लोक अशा प्रलोभनांना बळी पडतात. कुठेही पैसे गुंतवण्याआधी त्या कंपनीबाबात खात्रीशीर माहिती मिळवली पाहिजे. कमी पैशांमध्ये ज्या कंपन्या जास्त पैसे देण्याचं आश्वासन देतात त्या हमखास बनावट कंपन्या असतात असं वारंवार स्पष्ट झाल्यानंतरही त्याच त्या चूका केल्या जातात आणि त्यातून फसवणूक होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्याआधी प्रत्येकाने सावध राहावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading